शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय ?

By admin | Updated: September 29, 2016 00:14 IST

अंजनगांव तालुक्यातील रहिमापूर चिंचोली येथील युवक अमर सुखदेव साबळे याची सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली.

मोबाईल गायब : अमर साबळेच्या हत्येचा ४८ तासानंतरही सुगावा नाही संदीप मानकर अमरावतीअंजनगांव तालुक्यातील रहिमापूर चिंचोली येथील युवक अमर सुखदेव साबळे याची सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली. दर्यापूर-अंजनगाव मार्गावर लेहगावनजीक ही घटना सोमवारी घडली होती. पण, ती मंगळवारी उघडकीस आली. ही घटना अनैतिक संबधातून तर घडली नाही ना? या दिशेने पोलीस तपास करीत असून ४८ तासनंतरही या घटनेचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. याप्रकरणी बुधवारी अमरच्या कुंटंूबियांचे बयाण दर्यापूर पोलिसांनी नोंदविले. मंगळवारी अमरावती येथील फॉरेन्सीक लॅबच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात अमरचे श्वविच्छेदन करण्यात आले. हत्येमागचे कारण अतिशय गुंतागुंतीचे आहे. हत्या कोणत्या कारणाने झाली, त्यादिशेने पोलिसांनी तपासाची दिशा फिरविली आहे. घटनास्थळावर पोलिसांना हत्या अधोरेखित करणारे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. तो वापरत असलेला मोबाईलही घटनास्थळावरून गायब असून तो बंद आढळून आला आहे. दर्यापूर पोलिसांनी लोकमतला दिलेल्या महितीनुसार अमरचे वडील सुखदेव साबळे यांचे दोन विवाह झाले आहेत. दोन्ही पत्नींपासून त्यांना अपत्ये आहेत. दर्यापूर येथील पत्नी पवन या मुलासोबत मृत अमरच्या वडिलांपासून विभक्त राहाते. मृत अमर आणि त्याचा सावत्र भाऊ पवन यांच्यामध्ये सोमवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान वादावादी झाली होती, असे पोलीस तपासात पुढे आले आहे. अमरने पवनसोबत वाद घालून त्याची दुचाकी मागितली होती. ही दुचाकी घेऊन तो चिंचोलीच्या दिशेने निघाला होता. पोलिसांनी यासंदर्भात तपास केला असता ही दुचाकी पवनच्या नावे नसून त्याने काही वर्षांपूर्वी ती अकोल्यातील एक गृहस्थाकडून खरेदी केली होती. दुचाकीची कागदपत्रे त्याच्या नावे नाहीत. त्यामुळे त्या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत. अमरला सख्खा लहान भाऊ आहे. त्याचे पोलिसांनी बयाण घेतले असता वर्षभरापूर्वी अमरचे अंजनगांव येथील युवतीशी आर्य समाजमंदिरात लग्न झाले होते. परंतु वाद झाल्याने तिने अमरला सोडून दुसरा विवाह केला होता. आता अमर आई- वडील व लहान भाऊ व त्याची दुसरी पत्नीसोबत रहिमापूर चिंचोली येथे राहत होता. तो मैत्र्य कंपनीत एजंट असल्याचे समजते. त्याला दारुचे व्यसन जळले होते. त्यामुळे हत्येच्या दिवशी म्हणजे सोमवारी त्याच्या वडीलांनी ही चिंचोली पोलिस स्टेशनला अमरविरुध्द तक्रार नोदविली होती. त्याचे वडील सुखदेव साबळे हे येथीलच एका शाळेत शिपाई पदावर कार्यरत आहे. मी शासकीय नोकरी करतो मला पगारही चांगला आहे. मुलांना हा पगार देतो. तरीही दोन्ही मुले मला चांगला पाहत नाहीत,असे त्या तक्रीरीत नमुद असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे अमराच्या हत्येमागचे नेमके कारण काय? हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. कोटुंबिक वाद की, पहिल्या बायकोच्या वादाचे कारण , की प्रवासा दरम्यान लुटमारी किंवा ईतर ठिकाणी तिसऱ्याच युवतीशी अनैतिक सबंध असा चौफेर दिशेने तपास दर्यापूर पोलिस करीत आहे. त्याच्या मृत्यूपूर्वी सावत्र भाऊ पवनशी शेवटचे बोलने त्याच्या भ्रमनध्वनीवरुन सोमवारी रात्री ९.३० वाजता झाल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. पण मोबाईल घटनास्थळावरुन गायब असल्यामुळे पोलिस मोबाईलचा शोध घेत आहे.फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञांच्या उपस्थितीत पीएम पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा त्याची धारदार अवजाराने गळा चिरून हत्या करण्यात आली. त्याच्या डोळयाच्या खाली कुऱ्हाडीच्या दांड्याने जोरदार वार केल्यामुळे नाकावर मोठा घाव असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे अमरावती फॉरेन्सीक लॅबचे तज्ज्ञ व फिंगर प्रिंट तज्ज्ञांना पाचारण केल्यानंतरच पंचनामा करण्यात आला. फॉरेन्सीक लॅबच्या वरिष्ठ तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या उपस्थिीत श्वविच्छेदन केले. पोलिसांचे पथक रवाना दर्यापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नितीन गवारे प्रकरणाचा तपास करीत आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अनुभवी पोलीस या पथकात समाविष्ट करण्यात आले असून ते चिंचोली, अंजनगांव व अकोला येथे जावून या प्रकरणाचा तपास करणार आहेत. कुटूंबाचा पूर्व इतिहास खुप गुंतागुंतेचा आहे. घटनास्थळी काहीही पूरावे सापडले नाही. त्यामुळे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहे. परिवाराचे बयाण घेण्यात आले आहे. - सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापूर