शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

संशयित कोरोनासंक्रमित महिलेचा झोपडीतच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:18 IST

अनिल कडू परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत गडकी गावातील एका संशयित कोरोना संक्रमित महिलेचा औषधोपचाराविनाच झोपडीत दुर्देवी मृत्यू ...

अनिल कडू

परतवाडा : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत गडकी गावातील एका संशयित कोरोना संक्रमित महिलेचा औषधोपचाराविनाच झोपडीत दुर्देवी मृत्यू झाला. मनकाय दहिकर (६८, रा. औरंगपुरा, गडकी) असे मृताचे नाव असून, २३ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. मृत्यू समयी ती एकटीच घरी होती.

मनकाय ही अचलपूर पंचायत समितीच्या कार्यालयालगत बी.एस.पाटील महाविद्यालय परतवाडा समोरील एका घरी घरकाम करायची. या घरी ती कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आली. त्या कोरोना संक्रमित रुग्णाची तिने सेवाही केली. दरम्यान तिची प्रकृती बिघडली. ताप, खोकला, सर्दी आणि श्वासोच्छावासास तिला त्रास होत असताना ती २२ फेब्रुवारीला उपचारार्थ अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पोहचली. तिने तेथे ओपीडी कार्डही काढले. यात तिला कुटीर रुग्णालयात जाऊन रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट करायला सांगितले.

ती कुटीर रुग्णालयातही पोहचली. तेथे तिला काहीच सुचले नाही. कुणाकडूनही तिला संदर्भ सेवा उपलब्ध झाली नाही. ती तेथून सरळ गडंकी (औरंगपूर) येथील आपल्या झोपडीत परतली. माहिती मिळताच एएनएम के.एस.टेकाम व गावातील आशा वर्करने २३ फेब्रुवारीला त्या महिलेशी संवाद साधला. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने त्या महिलेला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला त्यांनी दिला. पण नातेवाईकांनी थोडावेळ मागितला. यातच अखेर २३ फेब्रुवारीला रात्री उशिरा त्या महिलेची प्राणज्योत मालवली. २४ फेब्रुवारीला तिच्या मोजक्याच नातेवाईकांनी पार्थिवावर अंतिम संस्कार केले.

गडकी (औरंगपुरा) गौरखेडा कुंभी ग्रामपंचायत अंतर्गत येत असून या घटनेनंतर त्या संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण केल्या गेले. या महिलेच्या संपर्कात आलेल्या तिच्या नातेवाईकांची कोरोना टेस्ट करण्यात येणार की कसे, हे स्पष्ट होऊ शकले नाही. खरे तर ती महिला गंभीर आजारी असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयानेच त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या किटच्या मदतीने या महिलेची रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट करायला हवी होती. किंवा त्या महिलेला तेथूनच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेतून कुटीर रुग्णालयात पाठवायला हवे होते. पण तसे झाले नाही. दरम्यान आरोग्य विभागाच्या किंवा राजस्वविभागाच्या कुठल्याही बड्या अधिकाऱ्यांनी वृत्तलिहिस्तोवर गडकी (औरंगपुराला)भेट दिलेली नाही.

कोट

गडकी (औरंगपुरा) येथील त्या महिलेच्या मृत्यूनंतर गावात निर्जतुकीकरण करण्यात आले आहे.

विनोद मोरे, ग्रामविकास अधिकारी, गौरखेडा कुंभी

कोट

महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. ती महिला मृत्यूपूर्वी कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याचे सांगितले जात आहे. मृत्यूपूर्वी त्या महिलेची कोरोना चाचणी झालेली नाही.

- के.एस.टेकाम, परिचारिका, गौरखेडा कुंभी