शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

परतवाड्यातील पांढऱ्या पुलावर जीवघेणे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST

परतवाडा : शहरातील नदीवरील पांढऱ्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची तीव्रता बघता पूल केव्हाही कोसळू शकतो. कालबाह्य झालेल्या ...

परतवाडा : शहरातील नदीवरील पांढऱ्या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांची तीव्रता बघता पूल केव्हाही कोसळू शकतो. कालबाह्य झालेल्या या पुलाचे प्रस्तावित बांधकाम १५ महिन्यापासून रखडले आहे. संबंधित ठेकेदाराने गाशा गुंडाळला आहे. पुलावर थांबणारे पावसाचे पाणी काढण्याकरिता त्या पुलालाच भगदाड पाडण्यात आले आहे.

अंजनगाव-परतवाडा- बेतुल- मध्यप्रदेश सीमेपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले आहे. रस्ता दर्जा सुधार कार्यक्रमांतर्गत या राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले. २७० कोटीहून अधिक खर्चाच्या या महामार्गाचे आणि पुलांचे बांधकाम पूर्ण झाले. या कामातच हा स्वातंत्र्यपूर्व काळातील पांढरा पूल काढून तेथे नवा पूल प्रस्तावित आहे.

या पुलावरून अचलपूर-परतवाडा शहराला पाणीपुरवठा करणारी चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन गेली आहे. ही पाईपलाईन काढण्याकरिता रस्ते महामार्ग अभियंत्याने १२ फेब्रुवारी २०२० ला अचलपूर पालिकेला पत्र दिले. यावर उशिरा नगरपरिषदेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला पत्र दिले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नगरपरिषदेला ही पाईपलाईन शिफ्ट करण्याकरिता २४ ऑगस्टला तांत्रिक मंजुरी मिळाली.

ती पाईप लाईन पुलावरच

ही मंजुरी मिळाल्यानंतर तीन निविदा प्रकाशित करूनही नगरपरिषदेला कंत्राटदार मिळाला नाही. म्हणून पाणीपुरवठ्याची पाईपलाईन, महामार्ग अभियंत्यांना वेळेत काढता आले नाही. या पाईपलाईनमुळे १५ महिन्यांपासून या पांढऱ्या पुलाचे बांधकाम सुरू होऊ शकले नाही. आजही ही पाईपलाईन त्याच पुलावर असून, अपघातास कारणीभूत ठरत आहे. दरम्यान ज्या कंत्राटदाराने महामार्गाचे काम केले त्या कंत्राटदाराने आपला गाशा गुंडाळला आहे. आपली सर्व यंत्रसामुग्री त्याने परतवाड्यातून इतरत्र हलविली आहे.

पूल हलतो, ट्रक झकोला मारतो

आज या पुलावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. या पुलावरून दहा चाकी, बारा चाकी, लोडेड ट्रकची मोठ्या प्रमाणात अनियंत्रित वाहतूक होत आहे. लोकही त्याच पुलावरून ये-जा करीत आहेत. जेव्हा लोडिंग ट्रक या पुलावरून जातो तेव्हा हा पूल हलतो. या जीवघेण्या गड्यातून जाताना हे ट्रक हेलकावे मारतात. यात अपघाताची शक्यता बळावली आहे.

पुलाचे आयुष्य संपले

शहरातून जाणाऱ्या या बिच्छन नदीवर स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी सर्वप्रथम हा पांढरा पूल बांधला. आज या पुलाचे आयुष्य संपले आहे. कुठल्याही क्षणी तो पूल कोसळू शकतो. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे.

एकाच ठिकाणी दोन पूल

स्वातंत्र्यानंतर अगदी या पुलाला लागूनच १९९७ मध्ये अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागाने दुसरा पूल उभारला. एकाच ठिकाणी लागून असलेल्या या दोन पुलांपैकी एका पुलावरून जाणारी तर दुसऱ्या पुलावरून येणारी वाहतूक वळती केल्या गेली. १९९७ पासून ही दुहेरी व्यवस्था शहरात अस्तित्वात आली. परंतु २०१७ मध्ये हा मार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित झाला. राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दर्जावाढ करून सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण केले गेले. यातच या पांढऱ्या पुलाचे बांधकाम प्रस्तावित आहे. पण हा पूल दुर्लक्षित आहे.