धक्कादायक : समीकरणे बदलणारअमरावती : जिल्हा परिषदेच्या मावळत्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी बुधवारी मातोश्रीवर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश घेतला. या नव्या घडामोडीमुळे जिल्ह्यातील राजकारण बदलण्याचे संकेत आहे.सुरेखा ठाकरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष, दोनदा जि.प. च्या अध्यक्ष, शासनाच्या विविध समित्यांवर त्यांनी पदे भूषविली आहे. शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू असलेल्या ठाकरे यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश कशामुळे केला, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी 'बॅकफूट'वर असताना सुरेखाताईंच्या प्रवेशाने तो धक्का मानला जात आहे.
सुरेखा ठाकरे यांचा शिवसेनेत प्रवेश
By admin | Updated: September 24, 2014 23:22 IST