शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षकांना नको व्हीआयपी फाईलची ब्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:43 IST

महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाचा (जीएडी) पायपोस कुणाच्याही पायात राहिलेला नाही. सहायक आयुक्तांना डावलून अनेक फायली थेट उपायुक्तांकडे जात असताना महत्त्वाच्या फायलींची ब्याद आपल्याकडेच नकोच, असा पवित्रा अधीक्षकांनी घेतला आहे.

ठळक मुद्देबांधकामामध्येच ठेवण्याचा सल्ला : जीएडीची निगरगठ्ठता उघड

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाचा (जीएडी) पायपोस कुणाच्याही पायात राहिलेला नाही. सहायक आयुक्तांना डावलून अनेक फायली थेट उपायुक्तांकडे जात असताना महत्त्वाच्या फायलींची ब्याद आपल्याकडेच नकोच, असा पवित्रा अधीक्षकांनी घेतला आहे. अधीक्षकांच्या या घोंगडे फेकण्याचा मानसिकतेचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची प्रतिक्रिया महापालिकेत उमटली आहे.नियमित आस्थापनेसोबतच कंत्राटीबाबतच्या सर्व संचिका जीएडीत असणे अभिप्रेत आहे. त्याबाबतची सर्व प्रक्रिया जीएडीतूनच चालते. त्या पार्श्वभूमीवर ‘व्हीआयपी फाइलला फुटले पाय’ या वृत्तातून ‘लोकमत’ने कंत्राटी तत्त्वावरील सेवानिवृत्त अभियंत्यांच्या महत्त्वपूर्ण फाइलवर प्रकाशझोत टाकला होता. आपल्या विभागातील फाइल कुठे आहे, हेही अधीक्षकांना माहीत नव्हते. त्यानंतर कार्यकारी अभियंता १ मध्ये कार्यरत असलेल्या सेवानिवृत्त कंत्राटी अभियंत्याने सदार यांच्या बाबतची ती फाइल आपल्याकडे असल्याची माहिती जीएडी अधीक्षकांना दिली. डाकेद्वारे ती फाइल पाठविण्याबाबत अधीक्षकांना विचारणाही केली. पण, ती फाइल तेथेच राहू द्या, उगाचच ब्याद नको, असे म्हणत अधीक्षकांनी ती महत्त्वपूर्ण फाइल परत पाठविण्याकरिता नकार दिला. अधीक्षकांकडून जीएडीतील फायलींच्या गोपनियतेची आणि गांभीर्याची कल्पना न केलेली बरी हेच हे सांगते. कार्यकारी अभियंता-१ च्या दालनातील कपाटात ती फाइल पडली असून, त्याच कार्यालयातून ती पुढे सरकवली जाते. मुदतवाढ जीएडीकडून प्रस्तावित करणे अभिप्रेत असताना अधीक्षकांनी बिनदिक्कतपणे ती महत्त्वपूर्ण फाइल आवक-जावक मध्ये न नोंदविता कंत्राटी अभियंत्याकडे दिली.म्हणून तुमच्याकडेच ठेवाकंत्राटी शहर अभियंता जीवन सदार यांच्या मुदतवाढीची फाइल सेवानिवृत्त कंत्राटी अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याकडून चालली. आयुक्त सिंगापूरला चालले असल्याने कुळकर्णींनी हातोहात फाइल फिरवून सदारांची मुदतवाढीवर आयुक्तांची स्वाक्षरी घेतली. ती फाइल जीएडीने चालविली नाही. त्यामुळे त्यापासून ती फाईल कुळकर्णींकडे असल्याचा पुनरूच्चार जीएडी अधीक्षकांना केला आहे. तसेही सदारांचा कार्यकाळ जूनमध्ये संपुष्टात येतो आहे. त्यामुळे त्या फाइलची आता गरजच भासणार नाही. त्यामुळे ती फाइल तुमच्याकडेच ठेवा, असा सूचना अधीक्षकांनी आपल्याला दिल्याचे कुळकर्णी म्हणाले.