शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

सुपर स्पेशालिटी, इर्विन रुग्णालयात समस्यांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:42 IST

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील समस्यांमुळे रुग्णांना या सेवेचा लाभ संपूर्णपणे मिळत नसल्याचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या भेटीत गुरुवारी उघड झाले. बंद असल्याचे सांगितलेली सोनोग्राफी मशीन मुळात तेथे नाही.

ठळक मुद्देरावसाहेब शेखावत यांची पत्रपरिषद : यंत्रसामग्री धूळखात, पदांची वानवा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील समस्यांमुळे रुग्णांना या सेवेचा लाभ संपूर्णपणे मिळत नसल्याचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या भेटीत गुरुवारी उघड झाले. बंद असल्याचे सांगितलेली सोनोग्राफी मशीन मुळात तेथे नाही. काही यंत्रे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत, तर कर्मचारी वर्ग अतिशय तोकडा आहे. याबाबत माजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत नाराजी व्यक्त केली.रुग्णालयातील लिफ्ट एक वर्षापासून बंद आहे. आयसीयू, एनआयसीयू, आॅपरेशन थिएटर, डायलिसीस विभागातील वातानुकूलन यंत्रणादेखील बंद असल्याचे पत्रपरिषदेपूर्वी शेखावत यांनी दिलेल्या भेटीदरम्यान निदर्शनास आले. येथे वर्ग-१ च्या अधिकाऱ्याचे १० पैकी १ पद, विषयतज्ज्ञ व वैद्यकीय अधिकाऱ्यांची २६ पैकी १५ पदे, वर्ग-३ ची १०४ पैकी ७४ पदे, चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची १७७ पैकी १४१ पदेच भरली गेली आहेत. १०० खाटांच्या या रुग्णालयात चार व्हील चेअर व स्ट्रेचर आहेत. अशा स्थितीत रुग्णांवर उपचार कसे करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.सुपर स्पेशालिटीच्या दुसºया टप्प्यातील इमारतीकरिता २०११-१२ मध्ये २९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. येथे कर्करोग, मेंदू व मज्जारज्जू तसेच हृदयविकारावरील उपचारासाठी तीन विभाग मंजूर झाले. मात्र, तीन वर्षांपासून इमारत व उपचार यंत्रणा धूळखात पडली आहे. वर्ग-३ चे ११ कर्मचारी वगळता, येथे मंजूर ४५३ पैकी तब्बल ४४२ पदे रिक्त आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहाचा फ्रीज बंद आहे. फाटकाला दगड लावले जातात. जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत अनेक डॉक्टरांची खासगी प्रॅक्टिस करतात, याकडेही लक्ष वेधण्यात आले. पत्रपरिषदेला अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.इर्विनही त्याच पठडीवरजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भेटीतही रावसाहेब शेखावत यांना अनागोंदी कारभार निदर्शनास आला. जळीत वॉर्डात एसी, तर अपघात कक्षाची लिफ्ट बंद आहे. काही वॉर्डांमध्ये सुरक्षाकर्मीच सलाइन लावतात. रुग्णालय परिसरातील १८ पैकी आठ सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत. त्यामुळे चोरी, वादविवाद, दारूला उधाण आले आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे रावसाहेब शेखावत म्हणाले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल