शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सुनील गजभियेचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:21 IST

बहुचर्चित शीतल पाटील हत्याकांडातील मुख्य आरोपी अ‍ॅड. सुनील गजभिये याचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) एच.व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर बुधवारी हा निर्णय दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुचर्चित शीतल पाटील हत्याकांडातील मुख्य आरोपी अ‍ॅड. सुनील गजभिये याचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला. जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) एच.व्ही. हांडे यांच्या न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर बुधवारी हा निर्णय दिला.आक्रमण संघटनेची पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ता शीतल पाटील यांचा मृतदेह १६ मार्च २०१८ रोजी गाडगेनगर हद्दीतील एक्स्प्रेस हायवेवरील एका विहिरीत आढळला. विहिरीत सुसाइड नोट मिळाल्यानंतर शीतल पाटीलने आत्महत्या केल्याचा कयास लावला गेला. तथापि, शीतल पाटीलचा भाऊ वैभवने हत्येचा संशय व्यक्त करून गाडगेनगर पोलिसांत संघटनेचा संस्थापक सुनील गजभिये व रहेमान खानविरुद्ध तक्रार नोंदविली. शवविच्छेदनात शीतल पाटील यांची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकण्यात आल्याचे स्पष्ट झाले. आरोपीला सहकार्य करणारा शिवदास गोंडाणे (रा. गडचिरोली), नीलेश मेश्राम आणि सुनील गजभियेची पत्नी राजेश्री यांनाही पोलिसांनी अटक केली. अनैतिक संबंधातून सुटका करण्यासाठी हत्येचा कट रचल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. गाडगेनगर पोलिसांनी चौकशी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनील गजभियेकडून न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याचा जामीन न्यायालयाने नाकारला आहे. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील संदीप ताम्हणे यांनी युक्तिवाद केला.असे आहे प्रकरण१३ मार्च २०१८ रोजी सायंकाळी शीतल पाटील बेपत्ता झाल्या. त्याच दिवशी इर्विन चौकात सुनील गजभियेसोबत शीतल पाटीलला पाहिले गेले होते. रात्री ८.३० वाजता मोबाइल लोकेशन चांदूर बाजारजवळील शिरजगाव बंड येथील होते. रात्री १०.३० वाजता शीतलचे आईसोबत शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर फोन बंद झाला. तीन दिवसांनतर त्यांचा मृतदेह एक्सप्रेस हायवेवरील विहिरीत आढळून आला. पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, रहमान खान सोबत असताना चांदूरबाजार रोडवर कारमध्ये सुनील व शीतलचा वाद झाला. त्यानंतर सुनीलने शीतलच्या डोक्यावर लोखंडी वस्तू मारून हत्या केली आणि मृतदेह विहिरीत फेकला.