गोल्डन गँगचा शोध : प्रलंबित कामे, अनुदानाची विल्हेवाट तपासणारअमरावती : आ. सुनील देशमुख यांनी मिशन महापालिका हे काम हाती घेतले आहे. मागील पाच वर्षांत महापालिकेत झालेली विकासकामे, प्रलंबित योजना, निधीचा खर्च, कामांचा दर्जा आदी इत्यंभूत माहिती पत्राद्वारे मागविली आहे. हे सर्व करण्यामागे केवळ गोल्डन गँगचा शोध घेत त्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी देशमुख जोमाने भिडले आहेत.सुनील देशमुख यांनी आमदार पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर काही दिवस मुंबईत मुक्काम ठोकला. मंत्रिमंडळाचा विस्तार आटोपताच अमरावती मतदार संघावर लक्ष केले आहे. मागील पाच वर्षांत शासन निधी, महापालिका निधी अथवा शासन अनुदानातून झालेल्या विकास कामांचा दर्जा चांगला मिळत नसल्याच्या तक्रारी देशमुख यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने कामांच्या स्थळी भेट देऊन ते नागरिकांच्या गाऱ्हाणी ऐकून घेत आहेत. महापालिकेत निधीची लूटविकास कामे निकृष्ट दर्जाची होत असतानासुद्धा या सर्व प्रकाराला पाठीशी घालणारे अभियंता व कंत्राटदारांची कानउघाडणी करण्यासही ते मागेपुढे पाहत नसल्याचे दिसून येते. दर दोन चार दिवसांनी सुनील देशमुख हे महापालिकेच्या नियंत्रणात सुरु असलेल्या विकास कामांच्या स्थळी भेट देऊन निकृष्ट रस्ते निर्मिती आणि बांधकाम होत असल्याचा भंडाफोड करीत आहे. काही कामे ही अधिकारी, कंत्राटदार व पदाधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार सुरु असल्याचा आरोपदेखील सुनील देशमुख यांनी केला आहे. कठोरा मार्गालगतच्या नारायणनगर परिसरातील आदर्शनगरात पावणे तीेन कोटी रुपये खर्चून नगरोत्थातंर्गत रस्ते निर्मिती सुरु आहे. मात्र या रस्त्याची निर्मिती पूर्ण होण्यापूर्वीच ६० टक्के रक्कम कंत्राटदारांना अदा करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेत निरंकुशपणे कारभार सुरु असल्याचा आरोप आ.सुनील देशमुख यांनी केला आहे. नागरिक कर भरीत असून हीच रक्कम शासन तिजोरीत जमा होते. याच रक्कमेतून विविध विकास कामे केली जातात. मात्र महापालिकेत शासन अनुदान, महापालिका निधीची लूट चालली असल्याचे सुनील देशमुखांचे म्हणने आहे. परिणामी मागील पाच वर्षात झालेल्या विकास कामांचा भंडाफोड करण्याच्या अनुषंगाने आ. देशमुख यांनी महापालिका आयुक्त अरुण डोंगरे यांच्या नावे पत्र देऊन सविस्तर माहिती वजा अहवाल मागविला आहे. शहरात होत असलेल्या विकास कामांचा दर्जा मिळत नसल्याची त्यांची प्रमुख तक्रार आहे. ही तक्रार देऊनही काहीच सुधारणा होत नसल्याने ही बाब आ. सुनील देशमुख यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. महापालिकेत जो काही गैरप्रकार सुरु आहे, त्यामागे गोल्डन गँग असल्याचा आरोप देशमुखांचा आहे. ही गोल्डन गँग निखंदून काढेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असा प्रण त्यांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)
सुनील देशमुखांचे मिशन महापालिका
By admin | Updated: January 1, 2015 22:53 IST