शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील सत्ताधिशांमध्ये स्वच्छतेवरून ‘सुंदोपसुंदी’

By admin | Updated: May 29, 2017 00:08 IST

शहरातील दैनंदिन स्वच्छतेचा कंत्राट मल्टीनॅशनल कंपनीला देण्यासाठी स्थायी समिती आग्रही असली तरी भाजपमधूनच या प्रक्रियेला जोरकस विरोधहोवू लागला आहे.

स्वच्छतेच्या केंद्रीय कंत्राटाला विरोध : प्रशासनाचा सावध पवित्रालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील दैनंदिन स्वच्छतेचा कंत्राट मल्टीनॅशनल कंपनीला देण्यासाठी स्थायी समिती आग्रही असली तरी भाजपमधूनच या प्रक्रियेला जोरकस विरोधहोवू लागला आहे. केंद्रीय कंत्राट पद्धती अर्थात मल्टीनॅशनल कंपनीला स्वच्छतेचा कंत्राट देण्यास विरोध करणाऱ्यांची संभावना ‘नया है वह’ मध्ये केी जात असली तरी भाजपमध्ये सर्व काही ‘आॅलवेल’ नसल्याचे यातून अधोरेखित झाले आहे.स्वच्छता कंत्राटाची मुदत संपुष्टात आल्यानंतर महापालिकेने २१ प्रभागांसाठी प्रभागनिहाय निविदा मागविल्या. तथापि स्थायी समिती सभापती म्हणून आरूढ झाल्यानंतर तुषार भारतीय यांनी प्रभागनिहाय ऐवजी संपूर्ण शहराच्या दैनंदिन स्वच्छतेसाठी एकच कंत्राटदार नेमण्याची भूमिका घेतली. हा कंत्राट मल्टीनॅशनल कंपनीला द्यावा, याबाबतचा ठराव ११ मे रोजी स्थायी समितीने मंजूर केला तथा निविदा प्रक्रिया राबविण्याची सूचना प्रशासनाला केली. मात्र तत्पूर्वीच या केंद्रीय कंत्राट पद्धतीला विरोध दर्शविणारे पत्र भाजपा व काँग्रेस नगरसेवकांकडून आयुक्तांना प्राप्त झाले. त्यामुळे ४५ सदस्यीय भाजपमध्ये तुषार भारतीय विरुद्ध अन्य भाजपाई असे चित्र निर्माण झाले. प्रभागनिहाय ऐवजी दुसरी पद्धत अवलंबवित असाल तर तो प्रस्ताव आमसभेसमोर यावा, असे पत्र महापौर संजय नरवणे यांनी देऊन स्थायीच्या भूमिकेला छेद दिला. यावरून तुषार भारतीय यांनी घेतलेल्या निर्णयाला बहुतांश नगरसेवकांचा विरोध होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमिवर स्वच्छतेचा कंत्राट प्रभागनिहाय व्हावा, की एकाच मल्टिनॅशनल कंपनीला तो द्यायचा, याबाबत प्रशासनातही संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्रीय (वनमॅन कॉन्ट्रॅक्ट) कंत्राटाच्या निविदेत काय ?घर ते घर कचरा संकलन, खुल्या गटारींची स्वच्छता, बंद गटारीची स्वच्छता, नाली स्वच्छता, सेप्टीक टँकची सुविधा, सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता, मृत प्राण्यांची विल्हेवाट, फॉगिंग अ‍ॅन्ड स्प्रेटींग, वृक्षकटाई आणि ग्रास कटींग या घटकांचा केंद्रीय कंत्राटामध्ये समावेश असेल. नया है वह !शहराच्या स्वच्छतेचा कंत्राट प्रभागनिहायच देण्यात यावा, अशी भाजपार्इंसह काँग्रेसी नगरसेवकांची मागणी आहे. याबाबत झोन क्र. १ ने ठरावही केला होता. मात्र महापालिकेत आल्यानंतर संबंधित भाजपाई नगरसेवकांवर दबाव आल्याने त्यावर काँग्रेसी नगरसेवक वगळता अन्यांची स्वाक्षऱ्या होवू शकल्या नाहीत. मात्र जो वेळेवर ठराव मांडण्यात आला त्यावर भाजपच्या १० पेक्षा अधिक नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. स्थायी समितीचे सभापतींना याबाबत विचारणा केली असता ठराव करणारे नवे आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली.