शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पर्णगळीने उन्हाळ्याचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 01:15 IST

पानगळ ही वृक्षांच्या जीवनातील एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेला वृक्ष ठरावीक ऋतुमध्ये वठलेला दिसतो. त्यानंतर त्याला नवे कपोल फुटतात. जगाच्या निरनिराळ्या भागात हा कालावधी वेगवेगळा आढळून येतो.

ठळक मुद्देउष्ण कटिबंधात हवामान शुष्क : वनस्पतींचा भार कमी होण्याची क्रिया

इंदल चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पानगळ ही वृक्षांच्या जीवनातील एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेला वृक्ष ठरावीक ऋतुमध्ये वठलेला दिसतो. त्यानंतर त्याला नवे कपोल फुटतात. जगाच्या निरनिराळ्या भागात हा कालावधी वेगवेगळा आढळून येतो. समशीतोष्ण प्रदेशात हा कालावधी शरद ऋतूचा असतो, तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ होते. पानगळीमुळे वनस्पतीमधील पानांद्वारे होणारे बाष्पीभवन थांबण्यास मदत होते, हे विशेष.आला शिशिर संपत।पाने गळत चालली।।या ओवीतून कवी निसर्गाचे छान विश्लेषण करतात. शांत निवांत शिशिर सरला. सळसळता हिरवा वसंत आला, असे कोकिळा गाणे गात असते. पर्यावरणाच्या दृष्टीने वर्षभरात सहा ऋतू येतात. प्रत्येक ऋतू वैशिष्ट्यपूर्णच. वर्षा ऋतूत पावसाच्या सरी कोसळतात.शिशिर ऋतूत थंडीचा कडाका असतो. शरद, हेमंत ऋतू व वसंत ऋतूत शुष्क वातावरणामुळे वनस्पतींना उन्हाळ्याची चाहूल लागते. फेब्रुवारी महिन्यात जवळपास ९५ टक्के झाडांची पाने गळून पडतात. याचे कारणच हे की, प्रत्येक वनस्पती हवा, पाणी व सूर्यप्रकाशावर जगतात. शिशिर ऋतूपर्यंत झाडांना पाणी मुबलक राहत असल्याने प्रत्येक मुळातून पानापर्यंत पाणी पोहचते. मात्र, शुष्क वातावरणात पाण्याची पातळी खालावत असल्याने झाडे मुळात पाणी साठवितात. पानांना पाण्याचा पुरवठा बंद होतो. परिणामी पान गळाली तरी झाड मात्र ओलसरच राहते, अशी माहिती भारतीय महाविद्यालयाचे प्राध्यापक यू.एस. पाटील यांनी दिली.आम्रवृक्षावर परिणाम नाहीविदर्भात वनस्पतींच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी पाच टक्के प्रजाती अशा आहेत, ज्यांची पाने वर्षभर गळत नाहीत. आम्रवृक्षाचीही पाने गळतात. मात्र, एकाच वेळी पूर्णत: गळत नसल्याने दिसून पडत नाही. कारण त्याची मुळे जमिनीत अत्यंत खोलवर गेलेल्या असतात. फांद्यांना पाणी मुबलक प्रमाणात मिळत असल्याने एकाच वेळी पूर्णत: पानगळ होत नसल्याची माहिती प्रा. डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.पानगळीनंतर फुलांचा बहरकाही वनस्पतींना पानगळ झाल्यावर फुले येतात. पानगळ झालेली अशी झाडे पक्षी, कीटक वा इतर सस्तन प्राण्यांकडून परागीभवन करून घेतात. पाने नसल्याने फुलांवर थेट प्रवेश होऊन रस शोषण करण्यात मिळत असल्याने कीटक त्यात सामावतात. काही काळातच फुलांच्या पाकळ्या बंद होऊन कीटक त्यात अडकतो, अशी निसर्गनिर्मित किमया विदर्भात फेब्रुवारी महिन्यात अनुभवास येते.