शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:11 IST

तळणीत १६० नागरिकांनी घेतला लसीकरणाचा लाभ धामणगाव रेल्वे : तालुक्यातील तळणी येथील ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने घेतलेल्या ...

तळणीत १६० नागरिकांनी घेतला लसीकरणाचा लाभ

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील तळणी येथील ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने घेतलेल्या पुढाकारात तब्बल १६० ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर व निंबोली आरोग्य उपकेंद्रातील डॉ. हेंडवे, डॉ. तोटे यांची उपस्थिती होती. सरपंच प्रीती पचारे, उपसरपंच विशाल भैसे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर लकडे, अनिता पारखंडे, माधुरी जानोस्कर, सुवर्णा कोल्हे, अविनाश धुर्वे तसेच माजी सरपंच वसंत पारखंडे यांनी नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले. याकरिता ग्रामपंचायत कर्मचारी विजय येलेकार, दत्तात्रय कोल्हे, कम्प्यूटर ऑपरेटर श्रीकांत मते तसेच गावातील तरुण स्वयंसेवक अक्षय येलेकर, अभिजित मून, पवन सिरस्कार, प्रवीण वडे, धीरज तवर, आरोग्य सेविका अलका अलोने, कर्मचारी पुष्पा सराते, आशा सेविका मनीषा राऊत यांनी सहकार्य केले.

--------------

मलकापुरातून मुलीला फुस लावून पळविले

भातकुली : तालुक्यातील खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर येथून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यात आले. २८ एप्रिल रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी आरोपी सोनू उर्फ दुर्गादास पवार (१९, शिंगणापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

फुबगाव येथे धुऱ्याला आग

नांदगाव खंडेश्वर: तालुक्यातील फुबगाव शिवारातील धुरा हेतुपुरस्सर जाळल्याने शेतातील १५ हजार रुपये किमतीच्या संत्रा कलमा जळाल्या, अशी तक्रार ज्ञानेश्वर गाढेकर (६१, नांदगाव) यांनी पोलिसांत नोंदविली. १७ ते २८ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. नांदगाव पोलिसांनी प्रदीप राजुरकर व अरुण वंजारी (दोन्ही रा. फुबगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------------

अडगाव ते यावली मार्गावरून ट्रॉली जप्त

अमरावती : अडगाव ते यावली रोडवरून रेतीची अवैध वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली. २८ एप्रिल रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली. माहुली पोलिसांनी नरेंद्र वानखडे यांच्या तक्रारीवरून आरोपी आकाश सोळंके (२१, यावली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------------

मंगरूळ चव्हाळा गावाजवळ अपघात

नांदगाव खंडेश्वर : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. १९ एप्रिल रोजी हा मंगरूळ चव्हाळा येथे हा अपघात झाला. म. कलाम म. अली हुसेन व मंजनकुमार शिवनाथ राम अशी जखमीची नावे आहेत. मंगरूळ पोलिसांनी एमएच १२ व्ही ६१११ क्रमांकाच्या चारचाकीचा चालक अनुज जैन (२८, रा. मंगरूळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

मोर्शीत १५ हजारांनी ऑनलाईन फसवणूक

मोर्शी : येथील संजय घुलक्षे यांची १५ हजार रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. २६ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास हा प्रकार घडला. घुलक्षे यांच्या ओळखीतील व्यक्तीच्या नावाच्या फेसबूक वॉलवरून आरोपीने १५ हजार रुपये गुगल-पे करावयास लावले. आयसीयूमध्ये असल्याने बोलता येणार नाही, असेही बजावले. ज्या फेसबूक मेसेंजरवरून पैशांबाबत चॅट झाले, ते घुलक्षे यांच्या ओळखीतील असल्याने त्यांनी पैसे पाठविले. मात्र, पुन्हा १५ हजारांची मागणी झाल्याने त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी आणखी रक्कम न पाठवता पोलीस ठाण्यात धाव घेतली. मोर्शी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

‘त्या’ अपघातप्रकरणी मृताविरुद्ध गुन्हा

शेंदूरजनाघाट : मलकापूर ते धनोडी मार्गावर दुचाकी झाडावर धडकून झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. २८ एप्रिल रोजी दुपारी ४ च्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी मृताचा भाऊ आशिष धाडसे यांच्या तक्रारीवरून शेंदूरजनाघाट पोलिसांनी मृत दुचाकीचालक संदीप धाडसे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------

महिलेचा विनयभंग

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील निमखेड बाजार येथे एका ४० वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. २७ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी आरोपी अमर वानखडे (रा. निमखेड बाजार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------

मेघनाथपुरातून गाय-गोऱ्हे लंपास

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील मेघनाथपूर येथून अर्जुन मन्वर यांच्या घरातून २० हजार रुपये किमतीची गाय व गोºहा लंपास करण्यात आला. २४ ते २५ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी सरमसपुरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

मल्हारा येथून दुचाकी लांबविली

परतवाडा : अचलपूर तालुक्यातील मल्हारा येथून राजाभाऊ शेनवारे (५१) यांच्या मालकीची एमएच २७ बीआर ५५०८ क्रमांकाची दुचाकी चोरीला गेली. २८ एप्रिल रोजी ही घटना घडली. परतवाडा पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

परतवाडा : भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार प्रभुदास गडलिंग (५४, देवमाळी) हे जखमी झाले. बस डेपोजवळ २७ एप्रिल रोजी हा अपघात घडला. याप्रकरणी परतवाडा पोलिसांनी एमएच १३ सीयू ६८६० या बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

------------

अपघातात चारचाकी चालक ठार

चिखलदरा : तालुक्यातील घटांग ते बिहाली रोडवरील नर्सरीजवळ चारचाकी वाहनाला अपघात होऊन त्यात चालकाचा मृत्यू झाला. सोबतच वाहनातील अन्य जण जखमी झाले. आशिष सोहनलाल कासदेकर (२२, रा. धारणी) असे मृताचे नाव आहे. १७ मार्च रोजी झालेल्या या अपघाताबाबत २८ एप्रिल रोजी चिखलदरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

-----------------

साईनगरातील वृद्धाची ऑनलाईन फसवणूक

दर्यापूर : येथील साईनगर परिसरातील ६७ वर्षीय व्यक्तींची ८१ हजार १५० रुपयांनी ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. एसबीआयचा अधिकारी बोलतो, अशी बतावणी आरोपीने केली तथा ओटीपी मिळवून फसवणूक केली. २३ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी ८७८९९५१८४१ या मोबाईलक्रमांक धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

बाळापूर शिवारातून मोटर लंपास

कुऱ्हा : नजीकच्या बाळापूर शिवारातून १५ हजार रुपये किमतीची विहिरीमधील मोटर लंपास करण्यात आली. २७ ते २८ एप्रिल दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी विक्रम पाटील यांच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.