शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:16 IST

मोर्शी : अनैतिक संबंधाचा आरोप करून एका ३० वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. २५ एप्रिल रोजी ही स्थानिक गाडगेनगरमध्ये ...

मोर्शी : अनैतिक संबंधाचा आरोप करून एका ३० वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. २५ एप्रिल रोजी ही स्थानिक गाडगेनगरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी गिट्टीखदान येथील एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

गाडगेनगरात मुलासह महिलेला मारहाण

मोर्शी : येथील गाडगेनगर भागात गिट्टी खदानमधील ४० वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली तसेच भांडण सोडविण्यासाठी आलेल्या तिच्या मुलालादेखील मारहाण करण्यात आली. २५ एप्रिल रोजी जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली. याप्रकरणी गाडगेनगर येथील चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

पवनी शिवारातून बैलजोडी लांबविली

वरूड : तालुक्यातील पवनी शिवारातून बैलजोडी लंपास करण्यात आली. २२ ते २३ एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. याप्रकरणी शेतकरी प्रदीप चौधरी (४०, रा. पवनी संक्राजी) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-----------------

अल्पवयीन मुलीला पळविले

चिखलदरा : तालुक्यातील एका गावातून १६ वर्षे ८ महिने वयाच्या मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. २१ एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी २६ एप्रिल रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

दिघी महल्ले घाटावर तरुणाला मारहाण

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील दिघी महल्ले येथील रेतीघाटावर मोहन बोबाटे (३०, मंगरूळ दस्तगीर) याला मारहाण करण्यात आली. २५ एप्रिल रोजी दुपारनंतर हा प्रकार घडला. मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी याप्रकरणी ऋषीकेश ठाकरे (४०) व आकाश भेंडे (रा. धामणगाव रेल्वे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

रायपूर कासारखेडमध्ये ग्रामपंचायत कार्यालयातील साहित्य जाळले

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील रायपूर कासारखेड येथील ग्रामपंचायत कार्यालयातील कम्प्यूटर टेबलला आग लावण्यात आली. यात संगणक, झेरॉक्स, प्रिंटर असे १ लाख ६१ हजारांचे साहित्य जळून खाक झाले. २६ एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. ग्रामसेवक दीपक शिकारे (३२) यांच्या तक्रारीवरून आरोपी अतुल रामभाऊ साठवणे (२६, रा. रायपूर) याच्याविरुद्ध दत्तापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

------------

फोटो पी २९ मनपा

बाजार समितीत दंड, कारवाई

अमरावती : स्थानिक बाजार समितीत फिजिकल डिस्टन्स न ठेवणे, मास्कचा वापर न करणे, सामाजिक अंतर न ठेवणे, रस्त्यावर थुंकणे, कोविड टेस्ट आदीबाबत दंडात्मक कार्यवाही करण्यात आली, तर एका आस्थापनेकडे कोविड १९ तपासणी प्रमाणपत्र नसल्याबाबत १००० रुपये दंड करण्यात आला.

----------

इतवारा बाजारातून दंड वसूल

अमरावती : इतवारा बाजार परिसरात अत्यावश्यक सेवेचे दुकान सोडून इतर दुकान सुरू असल्याने एका आस्थापनेकडून १०,००० रुपये दंड वसूल करण्यात आला. इर्विन चौक परिसरात दोन आस्थापनांकडून प्रत्येकी १०,००० प्रमाणे २०,००० रुपये दंड असा एकूण ३१,००० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. बुधवारी ही कारवाई करण्यात आली. ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक बुरे, झोन क्र.२ चे सर्व स्वास्थ्य निरीक्षक उपस्थित होते.

---------

अकारण फिरणाऱ्यांची कोविड चाचणी

अमरावती : शहरात विनाकारण फिरत असलेल्या नागरिकांची लालखडी चौकात मोबाईल व्हॅन आरोग्य विभागाच्या टीमद्वारे १९ जणांची आरटी-पीसीआर टेस्ट करून घेण्यात आली. सहायक आयुक्त भाग्यश्री बोरेकर, सहायक आयुक्त प्राची कचरे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विक्की जेधे, अभियंता सहाळे, स्वास्थ्य निरीक्षक सी.आर.पछेल, ए.एम. सैयद, जीवन राठोड, मोहित जाधव, मनीष नकवाल व कर्मचारी उपस्थित होते.

-----------

पाणीपुरवठ्याकडे पालिकेकडून दुर्लक्ष

अचलपूर : परतवाडा शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेकरिता चंद्रभागा धरणावर ९.१६१ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित केले गेले. यातील ६.१५० दलघमी पाण्याचा वापर नगर परिषदेने सुरू केला. या ६.१५० दलघमी पाण्यासोबतच १.५० दलघमी वाढीव पाण्याचा प्रस्ताव नगरपालिकेकडून पाटबंधारे विभागाकडे सादर करण्यात आला. पण, पाणी वितरण व्यवस्थेतील पाईप लाईनवरील मोठी गळती नगर परिषदेकडून वर्षानुवर्षे आजही दुर्लक्षित आहे.

----------

उन्हाळ्यात कूलर सजगतेने वापरण्याचे आवाहन

येवदा : उन्हाळ्याच्या दिवसांत घरोघरी कूलर निघाले आहेत. कूलरचा वापर थ्री-पीन प्लगवरच करावा. घरात अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर्स बसवून घ्यावेत. अर्थिंग योग्य असल्याची तपासणी सातत्याने करावी. कूलरमध्ये पाणी भरतेवेळी आधी वीज प्रवाह बंद करून प्लग काढावा. मगच त्यात पाणी भरावे. कूलर लाकडी स्टॅण्डवर ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.

-----------------

धारणीच्या शासकीय कार्यालयात पाणीटंचाई

धारणी : मुख्यालयामध्ये जवळपास १७० गावांतील नागरिक हजारोंच्या संख्येने दररोज तहसील व पंचायत समिती कार्यालयात विविध कामांसाठी येतात. त्यामुळे तहसील व पंचायत समिती या दोन महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी जनतेकडून जोर धरू लागली आहे.

------------

नवे रोहित्र लावण्याची शेतकऱ्यांची मागणी

पुसला : शेतातील डीबीवरील उच्च दाबामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने शेतातील ओलीत करणे कठीण होत आहे. त्यामुळे नवीन डीबी बसविण्याची मागणी युवा मित्र मंडळ व शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली आहे. नवीन डीबी बसविण्याची मागणी सूरज धर्मे, संदीप बागडे, योगेश विंचूरकर, राजेश गजभिये, अतुल पाटील, योगेश ढोरे, हर्षल ढोरे , दत्तू अळसपुरे, होमचंद जिचकार, दयाराम गोंडाणे यांनी केली.

---------------