शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:14 IST

अल्पवयीन मुलीला पळविले वरूड : तालुक्यातील एका १४ वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेण्यात आले. १७ एप्रिल रोजी पहाटे ...

अल्पवयीन मुलीला पळविले

वरूड : तालुक्यातील एका १४ वर्षीय मुलीला फुस लावून पळवून नेण्यात आले. १७ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना उघड झाली. याप्रकरणी वरूड पोलिसांनी आरोपी सतीश साहेबराव कोकरे (१९, अंबाडा, ता. मोर्शी) याचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

---------------

कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

मोर्शी : येथील एका मंगल कार्यालयासमोर कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मुलगी गंभीर जखमी झाली. १७ एप्रिल रोजी सायंकाळी हा अपघात घडला. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी एमएच २७ एच ८१४४ या कारच्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-------------

गिट्टीखदान परिसरातून बांधकाम साहित्य लंपास

मोर्शी : येथील गिट्टीखदान परिसरातील पालिकेच्या नवीन इमारतीच्या बांधकामस्थळाहून १६ हजार ५०० रुपये किमतीचे लोखंडी बार व १५ सिमेंट पोती लंपास करण्यात आली. १७ एप्रिल रोजी ही घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी श्रीकांत ढोमणे (मोर्शी) यांच्या तक्रारीवरून आकाश रामपुरे (गिट्टीखदान) याचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

----------------

जीआय पाईप लांबविणारी टोळी अटकेत

ंअंजनगाव सुर्जी : पाणी पुरवठा योजनेतील जीआय पाईप ट्रकमध्ये टाकृून लांबविण्याच्या बेतात असलेल्या पाच जणांच्या टोळीला रहिमापूर पोलिसांनी अटक केली. १६ ते १७ एप्रिलच्या रात्रीदरम्यान ही घटना घडली. १ लाख ५२ हजार रुपये किमतीच्या पाईपसह एमएच २६ बीई ८८१८ हा ट्रक जप्त करण्यात आला. याप्रकरणी रहिमापूर पोलिसांनी आरोपी सपान चाऊस, शेख हसत, शेख मुद्दशिर, सै. फुरखान, फिरोजखान (रा. नांदेड) यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी जीआर कंस्ट्रक्शनचे हितेंद्रसिंग राजपूत यांनी तक्रार नोंदविली.

-------------------

चौकीदाराकडून ग्रामस्थाला मारहाण

धारणी: तालुक्यातील खाºया टेंभरू फॉरेस्ट भागात तेथीलच घनशाम राठोड यांना मारहाण करण्यात आली. तथा त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करण्यात आली. १७ एप्रिल रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी फॉरेस्टचा चौकीदार रामनाथ धुर्वे याचेविरूद्ध धारणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

--------------

मांजरखेड कसबा येथे चोरी

चांदूरररेल्वे: तालुक्यातील मांजरखेड कसबा येथील निजामशहा जबार शहा यांच्या घरातून ८५०० रुपयांच्या ऐवज चोरीला गेला. १६ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली. चांदूररेल्वे पोलिसांनी १७ एप्रिल रोजी याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला.

--------------

बग्गी येथे तरूणाला मारहाण

तळेगाव दशासर: स्थानिक पोलीस ठाण्याअंतर्गत येणाºया बग्गी येथे मयुर गोपाल गिरी (२४) याला मारहाण करण्यात आली. आजोबाला मारण्यासाठी धजावलेल्या आरोपीला समजाण्यास गेला असता २६ मार्च रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी १७ एप्रिल रोजी आरोपी किशोर हरिभाऊ भारती (४०, बग्गी) याचेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

जळका पटाचे येथे मारहाण

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील जळका पटाचे येथील अतुल ढुके (३५) याला काठ्यांनी मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. १७ एप्रिल रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी तळेगाव पोलिसांनी आरोपी मधुकर पंधराम, अंकुश पंधराम, हरिश पंधराम, प्रवीण पंधराम (सर्व रा. जळका पटाचे) यांचेविरूद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------

पेठेनगरमध्ये महिलेला मारहाण

धामणगाव रेल्वे : येथील पेठेनगर भागातील ४९ वर्षीय महिलेला मारहाण करण्यात आली. तथा तिच्या पतीला शिवीगाळ करण्यात आली. १७ एप्रिल रोजी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी आरोपी चंद्रशेखर रावेकर (५५) व एका महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

दाभाडा येथे पुतणीला मारहाण

ंअंजनसिंगी: मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाºया दाभाडा येथे एका मुलीस मारहाण करण्यात आली. आई व काकामध्ये होणारा वाद शमविण्याचा प्रयत्न करत असताना १७ एप्रिल रोजी ही घटना घडली. करणी केल्याच्या कारणावरून हा वाद झाला. मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी आरोपी सुरेश थुले (५०, रा. दाभाडा) याचेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------

चिखलदºयात माकडांचा हैदोस

चिखलदरा: माकडांचा मोठा कळप चिखलदरा पर्यटन स्थळावरील विविध पॉइंट्सह शहरात धुमाकूळ घालीत आहेत. त्यांच्या मर्कटलीलांनी पर्यटकांसह नागरिक कमालीचे दहशतीखाली आले आहेत. यासंदर्भात नागरिकांनी अनेक निवेदन देऊन सुद्धा व्याघ्र प्रकल्प किंवा वन विभागातर्फे कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

-----------------

तळवेल येथे हत्तीरोग रुग्णांना किटचे वाटप

तळवेल : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हत्तीपाय विकृती व्यवस्थापन व प्रतिबंधात्मक उपाय योजना साहित्य व किट वाटप करण्यात आले. चिकित्सालय प्रमुख एम.जी.मदनकर, डॉ. मिलिंद पाठक, डॉ. वर्षा डोंगरे उपस्थित होते. कार्यक्रमाला पी.एस. मेहरे, एच. अढाऊ, आरोग्यसेविका एस.एम.काळे, एस. जी.डोरले, एच. यु. बिजवे, हेमंत दिवान, शेकार, मेटांगे, शितल वासनकर, राठी, बावनेर यांची उपस्थिती होती.

------------

विदर्भाच्या कॅलिफोर्नियात संत्रा प्रकल्प होईल?

मोर्शी व वरूड तालुक्यात अनेकदा संत्रा प्रकल्पांची घोषणा झाली. मात्र प्रत्यक्षात येथे संत्रा प्रकल्प आणण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले. आता पून्हा अत्याधुनिक संत्रा प्रकल्पाची घोषणा झाली. अपेक्षा पल्लवित झाल्या असल्या तरी हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारणार काय? अशी शंका संत्रा उत्पादकांना आहे.

--------------