शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:09 IST

चिखलदरा : शहरातील देवी पॉइंट येथून एमएच २७ एडी ७८८५ क्रमांकाची दुचाकी २४ जून रोजी अज्ञात चोरट्याने लंपास केली. ...

चिखलदरा : शहरातील देवी पॉइंट येथून एमएच २७ एडी ७८८५ क्रमांकाची दुचाकी २४ जून रोजी अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी मोहन महादेवराव दाभणे (४१, रा. भूगाव) यांनी चिखलदरा पोलीस ठाण्यात २७ जून रोजी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------

पवनी येथे महिलेला दगड मारला

वरूड : तालुक्यातील पवनी संक्राजी येथे कामावर जात असलेल्या महिलेला आरोपी महिलेने शिवीगाळ केली. मध्यस्थी करण्यास आलेल्या मुलाला तिच्या पतीने शिवीगाळ केली व महिलेला मारण्याची चिथावणी दिली. त्यामुळे आरोपी महिलेने दगड मारला. तो डोक्याला लागून रक्त निघाले. याप्रकरणी माणिकराव परतेती, बंडू परतेती व दोन महिलांविरुद्ध वरूड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी २६ जून रोजी या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला.

--------------

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार

मोर्शी : तालुक्यातील मेंगवाडी ते मोर्शी मार्गावर अंबाडा शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत गुणवंत जयराम मरसकोल्हे हा मरण पावला. २५ जून रोजी साडेआठ वाजता हा अपघात घडला. याप्रकरणी विनोद लेकुरवाडे यांनी मोर्शी पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. मृत गुणवंतचे वडील जयराम हे लेकुरवाडे यांच्या शेतात सोकारी आहेत.

-------------

कांतानगरात चोरी

अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांतानगर येथे वैभव अरविंद ठाकरे (३७) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे रिंग, चांदीचे शिक्के व १५ हजार रुपये असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल २६ जूनच्या रात्री लंपास केला. यावेळी वैभव ठाकरे हे पत्नीला आणण्यासाठी गावी गेले होते. गाडगेनगर पोलिसांनी २७ जून रोजी गुन्हा नोंदविला.

---------------

आठवडी बाजारातून संशयिताला अटक

बडनेरा : नवी वस्तीतील आठवडी बाजारात फिरत असलेला शेख असिफ शेख बशीर (३०, रा. आदिवासीनगर) याला संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हे नोंदविल्यानंतर समजपत्रावर सोडण्यात आले.

-----------

चहा विक्रेत्याविरुद्ध पोलिसांची कारवाई

अमरावती : शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उस्मानिया मशीदनजीक विनोद नंदकिशोर वरके (३०) या चहा विक्रेत्याला मास्क न घालता व्यवसाय करीत असल्याबद्दल गुन्हा नोंदविण्यात आला. २७ जून रोजी ही कारवाई करण्यात आली.

------------

शहर कोतवाली पोलिसांचा दोघांविरुद्ध कारवाई

अमरावती : चेहऱ्याला मास न लावता व्यवसाय करीत असल्याबद्दल सय्यद अब्दुल सय्यद ताजू (५३) व अम्र झिशान फय्यद शेख (२९) यांच्याविरुद्ध इर्विन चौकात कारवाई करण्यात आली. २७ जून रोजी कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

---------------

मास्क न बांधल्याने भातकुली पोलिसांची कारवाई

भातकुली : चेहऱ्यावर मास्क न बांधल्याने भातकुली पोलिसांनी मुख्य रस्त्यावर श्रीकृष्ण श्रीनिवास रेड्डी (३३, रा. यशोदानगर नंबर १) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. २७ जून रोजी ही कारवाई करण्यात आली.

----------------

ट्रॅक्टरच्या धडकेत लेक ठार, आई जखमी

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील हिवरा मुरादे ते वडाळा दरम्यान गवताचे ओझे दुचाकीवर घेऊन येणाऱ्या माय-लेकाला ट्रॅक्टर ने धडक दिली. यामुळे एमएच २७-००२१ क्रमांकाच्या दुचाकीवरील करण गब्बर मांडोकर हा ठार झाला, तर त्याच्या आईला गंभीर जखमी झाली आहे. २६ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी अज्ञात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------

मुलाचा पित्याच्या अंगठ्याला चावा

मंगरूळ चव्हाळा : गावाला जाण्याकरिता पित्याने पैसे न दिल्याने मद्यपी मुलाने अंगठ्याला चावा घेतला. शिवरा येथे २४ जून रोजी ही घटना घडली. प्रशांत बनसोड (४५) यांच्या तक्रारीवरून आकाश प्रशांत बनसोड याच्याविरुद्ध मंगरुळ पोलिसांनी गुन्हा नोंदविला.