शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सारांश बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:15 IST

परतवाडा : धारणी रोडवरील गौरखेडा कुंभी येथे दोन दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात घडला. ५ जून रोजी रात्री ९ च्या ...

परतवाडा : धारणी रोडवरील गौरखेडा कुंभी येथे दोन दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात घडला. ५ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी एमएच २७ एम २२३७ व एमएच २७ वाय ११८६ क्रमांकाच्या दुचाकीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

-----------

ब्राम्हणवाडा थडी येथे मारहाण

ब्राम्हणवाडा थडी : येथील दीपक दामेधर (३८) याने गावातीलच एका महिलेला शिवीगाळ व तिच्या पतीला मारहाण केली. ८ जून रोजी सकाळी ८ च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी आरोपी दीपक दामेधरविरुद्ध गुन्हा दाखल केला.

----------------

चांदूर बाजारात मोबाईल शॉपी फोडली

चांदूर बाजार : येथील बालक लाईनमधील आई मोबाईल शॉपी फोडून ४३ हजार ५०० रुपये किमतीचे २८ मोबाईल व अन्य साहित्य लंपास करण्यात आले. ५ जूननंतर ही घटना उघड झाली. सागर सातव यांच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------

ओंकारखेडा येथे सासूला मारहाण

नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील ओंकारखेडा येथे एका महिलेला मारहाण करण्यात आली. तिच्या मुलीलादेखील मारहाण करण्यात आली. ६ जून रोजी सकाळी ही घटना घडली. नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी याप्रकरणी सलिन्द भोसले (४०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------

दारापूर येथे तरुणाला मारहाण

भातकुली : तालुक्यातील खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारापूर येथे हरिहर लांडे (३८) याला मारहाण करण्यात आली. ६ जून रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी खोलापूर पोलिसांनी आरोपी शुभम पारे (रा. दहिगाव, ता. अंजनगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

हिवरखेड येथून रेती जप्त

मोर्शी : तालुक्यातील हिवरखेड येथील नागठाणा मंदिर रस्त्यावरून एमएच २७ - ४३१७ क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरीची रेती जप्त करण्यात आली. ६ जून रोजी रात्री ही कारवाई करण्यात आली. पीएसआय शरद भागवतकर यांच्या तक्रारीवरून आरोपी नीलेश घोरमाडे व अमोल महल्ले (३६, दोन्ही रा. हिवरखेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

----------------

दापोरी येथे इसमाला मारहाण

मोर्शी : तालुक्यातील दापोरी येथे सुनील राऊत (४५) यांना मारहाण करण्यात आली. पोलीस ठाण्यात तक्रार का द्यायला लावली, अशी विचारणा करीत ६ जून रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी आरोपी अनिल डाखोळे (४२, दापोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

वरुडातून पार्सल चोरीला

वरूड : येथील बस स्टॅन्डच्या मागे असलेल्या एका कुरियर कार्यालयातून ३६ सीलबंद पार्सल चोरीला गेले. ४ जून च्या रात्री ही घटना घडली. याप्रकरणी वैभव प्रमोद सातफळे (रा. साखरपुरा) यांच्या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

------------------

चांदूरवाडीतील कोरोनाग्रस्ताच्या घरातून एक लाख लंपास

चांदूर रेल्वे : तालुक्यातील चांदूरवाडी येथील एका कोरोनाबाधित महिलेच्या घरातून एक लाख रुपये रोख लांबविण्यात आले. १८ ते २२ मे दरम्यान ही घटना घडली. संबंधित महिला ही कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असताना हा प्रकार घडला. चांदूर रेल्वे पोलिसांनी आरोपी गब्बर ऊर्फ मंगेश सलामे (रा. चांदूरवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

-------------

जळका पटाचे येथे चोरी

तळेगाव दशासर : जळका पटाचे येथील शरद तलमले (२७) यांच्या घरातून ९२०० रुपयांचे दागिने व रीतेश राऊत यांच्या घरातून २५०० रुपये रोख लंपास करण्यात आले. ६ जून रोजी रात्री १ ते २ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

---------------