शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
4
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
5
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
6
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
7
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
8
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
9
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
10
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
11
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
12
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
13
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
14
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
15
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
16
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
17
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
18
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
19
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार

उखडलेल्या रस्त्यावरून सुलभा खोडके संतापल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

या मार्गावर रोज किरकोळ अपघात घडत आहेत. ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. १० नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर रस्ता दुरुस्तीच्या नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन आमदार सुलभा खोडके यांनी पदाधिकाऱ्यांसह या मार्गाची सोमवारी पाहणी केली.

ठळक मुद्देबांधकाम विभागाला सूचना : वलगाव, चांदनी चौकात पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदनी चौक, वलगाव मार्ग व राजापेठ परिसरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे पूर्ण वाट लागली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, असे चित्र असल्याने आमदार सुलभा खोडके यांनी बांधकाम विभागाला खडेबोल सुनावले. १० नोव्हेंबरला ईद-ए-मिलाद सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार असल्याने तत्पूर्वी हा परिसर खड्डेमुक्त करण्याची सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला केली.या मार्गावर रोज किरकोळ अपघात घडत आहेत. ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. १० नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर रस्ता दुरुस्तीच्या नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन आमदार सुलभा खोडके यांनी पदाधिकाऱ्यांसह या मार्गाची सोमवारी पाहणी केली. यावर्षी सतत पाऊस पडत असल्याने शहरातील रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. गेल्या चार महिन्यांपासून या खड्ड्यांची खोली वाढतच चालली आहे. जनसामान्यांची सुरक्षितता, सुरळीत वाहतुकीसाठी रस्ते तत्काळ खड्डेमुक्त करण्याच्या सूचना आमदार खोडके यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाºयांना या पाहणी दौºया दरम्यान केल्यात.दर्जेदार रस्ते बांधकामासह त्याची देखभाल करण्याची जबाबदारी लक्षात घेता अपघात विरहीत शहराकरिता नागरिकांच्या सुरक्षेला घेऊन कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका या दरम्यान आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकी दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना भौतिक सुविधा, नागरी तसेच मूलभूत सुविधांच्या पूर्ततेचे अभिवचन नागरिकांना दिले होते. त्या अनुषंगाणे त्यांनी पाहणी केली. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा मित्र पक्षाचे सदस्य व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी- कर्मचारी व नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा