शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात राबविले जाणार सुजलाम् अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:16 IST

हगणदरीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे साध्य करण्यासाठी आणि ग्रामीण भागात शोषखड्ड्यांच्या निर्मितीतून सांडपाणी व्यवस्थापन करणे या बाबींचा समावेश ...

हगणदरीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे साध्य करण्यासाठी आणि ग्रामीण भागात शोषखड्ड्यांच्या निर्मितीतून सांडपाणी व्यवस्थापन करणे या बाबींचा समावेश आहे. या कालावधीत जिल्ह्यात अभियान कालावधीत किमान ४० हजार शोषखड्डे तयार करण्याचे लक्ष निश्चित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतनिहाय उदिष्टे निश्चित करण्यात आले आहे.

हगणदरीमुक्तीची शाश्वतता टिकविणे आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक इतक्या शोषखड्डयांचे बांधकाम पूर्ण करणे, यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करावा. हगणदरीमुक्ती (ओ.डी.एफ.) ची शाश्वतता टिकविणे आणि नियोजित शोषखड्ड्यांचे बांधकाम करण्यासाठी १०० दिवसांचा आराखडा प्रत्येक ग्रामपंचायत तयार करणार आहे. नादुरुस्त शौचालयांची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. नादुरुस्त शौचालय

अंतर्गत शौचालय दुरुस्त करण्यासाठी कुटुंबांची निवड करण्यासाठी द्वितीयस्तर हगणदरीमुक्ती ग्रामपंचायत पडताळणी पूर्ण करावी तसेच

सर्व नवीन कुटुंबांकडे शौचालय असल्याबाबतची खात्री करावी. हे अभियानाबाबत लोकांना माहिती देण्यासाठी व सहभागासाठी आणि कृतीत

उतरविण्यासाठी वृत्तपत्रे, सोशल मीडिया व इतर माध्यमातून अभियानाची जनजागृती करण्यात येणार आहे. अभियानाचे जिल्हास्तरावरून संनियंत्रण करण्यासाठी अभियान कालावधीत जिल्हास्तरावरील जिल्हा कक्ष आणि विविध विभागांचे

खातेप्रमुखांच्या क्षेत्रीय भेटी होणार आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ मार्गदर्शिकेप्रमाणे हगणदरीमुक्त शाश्वतता आणि

शोषखड्ड्यांचे बांधकाम यासाठी लागणारा निधी स्वच्छ भारत मिशन पंधरावा वित्त आयोग किंवा मनरेगा यांच्या माध्यमातून उपलब्ध केला जाणार आहे.

पूर्ण झालेल्या शोषखड्ड्यांची ( वैयक्तिकस्तर व सार्वजनिक स्तर ) माहिती स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत उपलब्ध असलेल्या एसबीएम-२.० मोबाईल ॲप्लिकेशनमधून नोंदणी करावी. प्रत्येक ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम् अभियान

यशस्वी होईल, यादृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व गटविकास आधिकारी यांना देण्यात आल्या आहेत, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी सांगितले.

बाॅक्स

जिल्ह्यात १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम् अभियान अंतर्गत हगणदरीमुक्त शाश्वतता टिकविण्यासाठी जिल्ह्यात ४० हजार शोषखडे निर्मिती करणार आहोत.

- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी