शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम प्रकरणातून गळफास घेऊन युवतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:08 IST

अमरावती : गत तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. युवतीने लग्नाची मागणी केली. मात्र, प्रियकराने लग्न करण्यास थेट नकार दिल्याने ३२ ...

अमरावती : गत तीन वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. युवतीने लग्नाची मागणी केली. मात्र, प्रियकराने लग्न करण्यास थेट नकार दिल्याने ३२ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भीमनगरात शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. ती भीमनगरातील मैत्रिणीकडे भाड्याने राहत होती. तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या प्रियकराविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदवला. त्याला रविवारी न्यायालयासोर हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांचा म्हणजे २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पवन मुकुंदराव खंडारे(२६, रा. राजमातानगर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी युवतीच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांना घटनास्थळी तिने प्रियकराला लिहिलेल्या प्रेम प्रकरणाच्या चिठ्ठ्या आढळून आल्यामुळेच तिने आत्महत्या का केली याचा उलगडा झाला. प्रेम प्रकरणादरम्यान तिचे लैंगिक शोषणही झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ३७६ अन्वये गुन्हा नोंदविला. युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इर्विन रुग्णालयातील शवागारात आणण्यात आला होता. पुढील तपास गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले करीत आहेत.

कोट

भावाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. आरोपीला न्यायालयाने दोन दिवसांचा पीसीआर दिला आहे. पुढील तपास सुरू आहे.

आसाराम चोरमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गाडगेनगर