शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एएसआयची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:14 IST

आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. आपल्या आत्महत्येस वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नये, असा संदेश त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केला आहे. 

ठळक मुद्देमृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठी : वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. आपल्या आत्महत्येस वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करू नये, असा संदेश त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत नमूद केला आहे. रामसिंह गुलाबसिंह चव्हाण (५४, रा. चपराशीपुरा) असे मृताचे नाव आहे. ते कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ३५ वर्षांपासून पोलीस सेवेत असलेले एएसआय रामसिंह चव्हाण यांच्या पश्चात पत्नी अनिता तसेच सागर व अमन ही दोन मुले आहेत. पत्नी अनिता महापालिकेत लिपिक आहेत. सागर हा पुणे व अमन हा अमरावतीतच शिक्षण घेत आहेत.गतवर्षी ड्युटीवर असताना रात्रीच्या वेळी रामसिंह चव्हाण यांना अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे ते बराच काळ कर्तव्यावर हजर राहू शकले नाहीत. या काळातील त्यांचे काही वेतन देणे शिल्लक होते. त्यांनी यासाठी पाठपुरावा केला. वेतन न मिळाल्याने ते पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाला पैसे पाठवू शकले नाहीत. त्यामुळे मानसिक तणावग्रस्त स्थितीत ते होते. रविवार रात्री कर्तव्य बजावल्यावर साप्ताहिक सुटी असल्याने रामसिंह हे सोमवारी घरीच होते. पत्नी अनिता नोकरीवर व मुलगा अमन हा महाविद्यालयात गेल्यानंतर त्यांनी बंद घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी २ वाजता अनिता यांनी त्यांना अनेकदा कॉल केला. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी शेजारी राहणाऱ्या नातेवाइकाला कॉल करून घरी जाण्यास सांगितले. घराची दारे बंद असल्याचे कळल्यावर त्या घरी परतल्या. त्यांनी खिडकीच्या काचा फोडून आत निरीक्षण केल्यानंतर ही धक्कादायक घटना उजेडात आली. रामसिंह चव्हाण यांना तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.रामसिंह १४०० दिवस अनुपस्थित पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरणरामसिंह चव्हाण हे १९९३ पासून आतापर्यंत एकूण १४०० दिवस कर्तव्यावर अनुपस्थित होते. २८ नोंव्हेंबर २०१८ ते १४ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत ते ७९ दिवस आजारपणाच्या कारणास्तव अनुपस्थित होते. चव्हाण यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर न करताही केवळ फिटनेस प्रमाणपत्राच्या आधारे माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांना कर्तव्यावर रूजू करून घेण्यात आले. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी ते कर्तव्यावर रूजू झाले. २०१८-१९ सालाचा ५० हजार ८९५ रुपये प्राप्तिकर फेब्रुवारी व मार्च महिन्यांच्या वेतनातून कपात करण्यात आला. त्यांच्या थकीत वेतनाचा, वैद्यकीय प्रमाणपत्राचा आणि वैद्यकीय रजांसंबंधीचा मुद्दा पूर्णत: प्रशासकीय बाब आहे. वर्षभरात रामसिंह यांना ५,६८,००० रुपये वेतनापोटी अदा करण्यात आलेत. त्याशिवाय २,३५,५६५ रुपये ही अ‍ॅरिअर्सची रक्कमही त्यांना देण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण पोलीस आयुक्तांनी दिले आहे.घटनास्थळी पंचनामा केला असता, आम्हाला सुसाइड नोट आढळून आली नाही. आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला. त्यावर कुणाचाही आक्षेप नाही.-आसाराम चोरमले,वरिष्ठ निरीक्षक, फ्रेजरपुरा पोलीस