शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उर्ध्व वर्धात पुरेसा पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:01 IST

सिंचनाकरिता जरी पाणी देणे बंद असले तरी उर्ध्व वर्धा प्रकल्पात अमरावती शहराला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा अद्यापही शिल्लक आहे. चिंता करण्याचे काहीही कारण नाही. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे मत उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकार्यकारी अभियंता : शहराला वर्षभर पुरेल, उद्योगासाठी राखीव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सिंचनाकरिता जरी पाणी देणे बंद असले तरी उर्ध्व वर्धा प्रकल्पात अमरावती शहराला वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा अद्यापही शिल्लक आहे. चिंता करण्याचे काहीही कारण नाही. पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असल्याचे मत उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद पोटफोडे यांनी व्यक्त केले.१६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह जलसंपदा विभाग व इतर विभागामार्फेत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने धरणातील पाणीसाठ्यात सतत घट होत असून भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे किंवा नाही या अनुषंगाने माहिती घेतली असता, अप्पर वर्धा धरणात २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये जिवंत पाणीसाठा हा १२० दलघमी असून वर्षभरात फक्त पिण्याकरिता ३६ दलघमी पाणीसाठ्याची मागणी असते. तीन महिन्यांनंतर पाऊस पडणारच आहे. तीन महिने १० दलघमी एवढ्या पाणीसाठ्याची पिण्याकरिता शहरात मागणी आहे. वर्षभरात ४५ ते ५० दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होते. सोफीया या वीज निर्मितीच्या उद्योगाकरिता प्रकल्पातून वर्षभरात २० दलघमीची मागणी असते. जुलै महिन्यापर्यंत फक्त ८ दलघमी पाणीसाठ्याची सोफीयाकरिता मागणी असून तो पाणीसाठा आरक्षित ठेवला आहे. प्रकल्पातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असली तरी अमरावती शहराला जो पाणीसाठा धरणातून देण्यात येतो त्यासंदर्भाची शहरात टंचाई राहणार नाही. पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यांतील पाणीसाठ्यांची स्थिती चिंताजनक आहे. त्याकारणाने पाणीसाठा जरी असला तरी पाण्याची बचत करणे अनिवार्य असल्याचे मत जलजागृती सप्ताह निमित्त अनेक वरिष्ठ अभियंत्यांनी व्यक्त केले आहे.