शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अकाली पावसाचा फटका

By admin | Updated: May 29, 2017 00:11 IST

शनिवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान झालेल्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला.

ठिकठिकाणी नुकसान : दोन दिवस तूर खरेदी बंद, वृक्ष उन्मळली; वीजपुरवठा खंडितलोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार/ नांदगाव खंडेश्वर : शनिवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान झालेल्या पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला. विशेष म्हणजे बाजार समितीमध्ये विक्रीस असलेली तूर भिजल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. नांदगावच्या बाजार समितीत नाफेडने खरेदी केलेली तूर ओलीचिंब झाली. अनेक शेतकऱ्यांच्या बाजार समितीच्या आवारात खुल्या मैदानात असलेल्या तुरीच्या गंजीखाली पाणी शिरल्याने शेतकऱ्यांनासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसला. पावसामुळे दोन दिवस तूर खरेदी बंद असल्याने महिनाभरापासून तूर मोजणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आणखी दोन दिवस तूर मोजणीसाठी थांबावे लागणार आहे.बाजार समितीत मोठ्या प्रमाणात तुरीची आवक वाढल्याने शेतकऱ्यांना जागेअभावी बाजार समितीच्या आवारात खुल्या मैदानात तूर ठेवावी लागली. ज्या तुरीच्या गंजींना ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आले होते. अशा गंजीच्या खालून पानी वाहिल्याने नुकसान झाले. चांदूरबाजार तालुक्यात लाखनवाडी, आसरा या गावांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. परिसरात वादळी पावसासह गारपीट झाली. वादळाचा वेग अधिक असल्याने नुकसान झाले. लाखनवाडी गावात नागरिकांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाले. विजेचे तार तुटून पडल्यामुळे विजपुरवठा खंडित झाला. विजेचे चार पोल व अनेक वृक्ष कोलमडून पडले. या घटनेची माहिती मिळताच नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी, पोलीस पाटील व कोतवाल यांनी पीक नुकसानीचा पंचानामा केला. चांदूरबाजार तालुक्यात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भातकुली तालुक्यात वादळी पावसामुळे मोठी झाडे कोसळली व वीजपुरवठा खंडित झाला. तिवसा येथील बाजार समितीमध्ये ढगाळ वातावरणामुळे तूर मोजणी बंद करण्यात आल्याने व त्यावर ताडपत्री झाकून ठेवल्याने मोठे नुकसान टळले. मोशी तालुक्यात रात्री उशिरा पाऊस पडला. मात्र आसपासच्या परिसरात वादळी पावसाची माहिती मिळाल्याने नागरिक सजग होते. कांदा पिकाला नुकसान अकाळी पावसामुळे बाजार समितीच्या यार्डात ठेवलेल्या तुरीचे नुकसान झाले. शेतातील उभ्या कादा पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला. कांद्याला भाव नसल्याने अनेक शेतकरी कांद्याची रस्त्यावर विक्री करीत आहेत. मात्र कांदा ओला झाल्याने तो सडण्याची शक्यता असून त्याचा भाव कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.