शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनवर असाही तोडगा! जनावरांचा बाजार आता सोशल मीडियावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 10:24 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आठवडी बाजार बंदच आहेत. त्यामुळे शेतकरी आता गुरांची खरेदी-विक्री सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत.

ठळक मुद्देबैल बाजार बंद झाल्याने बळीराजा हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आठवडी बाजार बंदच आहेत. त्यामुळे शेतकरी आता गुरांची खरेदी-विक्री सोशल मीडियाच्या माध्यमातून करीत आहेत. सोशल मीडियावर आपल्या जनावरांचे फोटो टाकून त्याखाली आपला मोबाइल क्रमांक दिला जातो. ज्या शेतकऱ्यांना जनावरांची खरेदी करायची आहे, त्यांनी मोबाईलवर संपर्क करण्याचे आवाहन केले जाते. त्यामुळे सोशल मीडियावरही आता गुरांची खरेदी-विक्री होताना दिसत आहे.

खरीप हंगाम महिनाभरावर आल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गुरांचा बाजार बंद आहे. त्यामुळे बैलांची खरेदी- विक्री बंद झालेली आहे. परिणामी वर्षभरात एक कोटीची होणारी उलाढाल ठप्प झाल्याने बैलांद्वारे केली जाणारी शेती मशागतीची कामे अडचणीत सापडली आहेत. हवामान खात्याने यंदा मान्सून हा जूनच्या १ तारखेला धडकणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आसेगावासह परिसरातील शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना वेग दिला आहे. सद्यस्थितीत शिवारात ट्रॅक्टरद्वारे नांगरणीच्या कामांना वेग आला आहे. वाढत्या महागाईमुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यावर भर देत असल्याचे दिसून येते. शेतकरी बैलांच्या साह्याने यंदा मशागतीची कामे करण्यास प्राधान्य देत आहे. एप्रिल व मे महिन्यांत बैलजोडी खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असताना मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलबाजार बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. काही शेतकरी वैयक्तिक स्तरावर बैलांचा शोध घेत आहेत. अशातच बैलांचे भावदेखील प्रचंड वाढले आहेत.दोन-तीन वर्षांपासून नापिकी होत असल्यामुळे चाराटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे दूध व्यवसायाची जनावरे विक्री केल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय उरलेला नाही. विक्री व खरेदी करण्याकरिता बैलबाजार पेरणीच्या तोंडावर खुला करण्यात यावा.- राजेंद्र नवले, शेतकरी, हिवरा पूर्णादोन-तीन एकर शेती असणाऱ्यांना यंत्राच्या साह्याने शेती करणे परवडत नाही. त्यामुळे बैलजोडीशिवाय लहान शेतकऱ्यांना पर्याय नाही. मात्र, लॉकडाऊनमुळे बैलबाजार बंद असल्याने बैलजोडी खरेदी-विक्री करण्याकरिता पेच निर्माण होत आहे.- योगेश कोळस्कर, शेतकरी, आसेगाव पूर्णा

 

टॅग्स :agricultureशेती