शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2022 05:01 IST

विविध योजनेंतर्गत १७ कोटी ८५ लक्ष रुपये प्राप्त निधीतून मोर्शी तालुक्यातील गावांमध्ये  विकासकामांचे भूमिपूजन ठाकूर यांनी केले. गावात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची निर्मिती करावी. गावातील नागरिकांच्या सुविधेसाठी कामे गतीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. मोर्शी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार सागर ढवळे आदी उपस्थित यावेळी होते. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गावात दर्जेदार शैक्षणिक सुविधा, उत्कृष्ट शालेय इमारती, वर्गखोल्या, प्राथमिक आरोग्य सुविधा, तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांनी सुसज्ज रुग्णालये यासह इतर भौतिक सुविधा, अद्ययावत व्यायामशाळा, परिसराचे सौंदर्यीकरण, सभागृहे, विश्रामगृहे, ग्रामपंचायत इमारती आदींची निर्मिती करताना जिल्ह्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी रविवारी दिली. विविध योजनेंतर्गत १७ कोटी ८५ लक्ष रुपये प्राप्त निधीतून मोर्शी तालुक्यातील गावांमध्ये  विकासकामांचे भूमिपूजन ठाकूर यांनी केले. गावात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची निर्मिती करावी. गावातील नागरिकांच्या सुविधेसाठी कामे गतीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. मोर्शी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार सागर ढवळे आदी उपस्थित यावेळी होते. मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी  येथे १ कोटी रुपये प्रमाणे प्राप्त निधीतून तळणी पिंपळखुटा रस्त्यावर दोन लहान पुलांच्या कामाचे भूमिपूजन, जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त सुमारे ६० लक्ष रुपयांच्या निधीतून पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम व १० लक्ष रुपयांच्या निधीतून रस्त्याचे लोकार्पण, १० लक्ष रुपयांच्या निधीतून मुस्लिम कब्रस्तानचे बांधकाम व  सौंदर्यीकरणचे भूमिपूजन ठाकूर यांनी केले. यावेळी सरपंच पल्लवी मानकर, उपसरपंच पद्मा डोळस आदी उपस्थित होते.मोर्शी तालुक्यातील शिरलस येथे दहा लक्ष रुपये निधीतून ग्रामपंचायत  भवनाचे व राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत नागरी सुविधा केंद्राचे  लोकार्पण, आठ लक्ष रुपयांच्या निधीतून व्यायाम शाळेचे लोकार्पण, शाळा वर्गखोली दुरुस्तीचे लोकार्पण पालकमंत्र्यांनी केले. यावेळी सरपंच निपेश चौधरी, रमेश काळे आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर