शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गटशेतीचे प्रस्ताव सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 22:41 IST

गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गटशेतीस चालना देण्याच्या योजनेंतर्गत प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांनी गटशेतीचे प्रस्ताव (डीपीआर) तातडीने जिल्हा प्रशासनास सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : आढावा बैठकीत कृषी अधिकाऱ्यांना निर्देश

आॅनलाईन लोकमतअमरावती : गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गटशेतीस चालना देण्याच्या योजनेंतर्गत प्रत्येक तालुका कृषी अधिकाऱ्यांनी गटशेतीचे प्रस्ताव (डीपीआर) तातडीने जिल्हा प्रशासनास सादर करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बांगर बोलत होते. यावेळी जि.प. सदस्य, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, उपजिल्हाधिकारी काळे, तालुका कृषी अधिकारी, गटांचे सदस्य उपस्थित होते. पुढे बोलताना बांगर म्हणाले, गटशेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गटशेतीस चालना देणे ही मुख्यमंत्र्यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात पाच ते सहा शेतकरी गट, उत्पादक कंपनी स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातून १५ प्रतिनिधी गट, उत्पादक कंपनी यांच्याद्वारा प्रस्ताव सादर करण्याची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत कृषी आयुक्तांना बैठकीत दिली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होण्याच्या दृष्टीने तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील कृषिक्षेत्राशी निगडित उत्कृष्ट गटांची निवड करून त्यांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनास सादर करावे अशा सूचना त्यांनी दिली. एका समूहातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रामध्ये सामूहिक नियोजनबद्ध शेती करणे, कृषिउत्पादनावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे, एकत्रित विपणन करणे यासाठी सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करणे, शेती या व्यावसायिक जीवनपद्धतीद्वारा स्वत:ची, गटाची, समूहाची उन्नती व विकास घडवून आणण्याची प्रक्रिया व रचना म्हणजे गटशेती होय, असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. गटशेती योजनेचा मुख्य उद्देश हा गटांना बळकटीकरण करणे हा आहे. सदर योजनेत सामूहिक लाभ ७५ टक्के व वैयक्तिक लाभ २५ टक्के दिला जाणार आहे. यासाठी गटामध्ये संघटन असणे महत्त्वाचे आहे. गटशेतीचे प्रस्ताव मंजूर झाल्यावर बँकेकडून वित्तपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गटशेतीच्या माध्यमातून हळद, ओवा, जिरे लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. यावर्षी हळदीचे उत्पादन चांगले झाल्याने भाव मिळवून देण्यासाठी प्रशासन सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला कृषी अधिकारी उपस्थित होते.