चांदूर बाजार : स्थानिक नगर परिषदेच्या विषय समिती सभापतींची १३ मार्च रोजी निवड करण्यात आली होती. मात्र, स्वीकृत सदस्याने सूचक म्हणून स्वाक्षरी केल्याचा मुद्दा गटनेता मनीष नांगलिया यांनी विभागीय आयुक्तांच्या दालनात पोहोचविला. विभागीय आयुक्तांकडे त्याबाबत तक्रार करण्यात आली. त्यावर विभागीय आयुक्त पुढील आदेशापर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहे.
स्थानिक नगर पालिका सभागृहात शिक्षण व आरोग्य समिती, बांधकाम समिती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. मात्र, बांधकाम सभापतीपदाच्या निवडणुकीत सूचक म्हणून स्वीकृत सदस्याने स्वाक्षरी केल्याने गटनेता मनीष नांगलिया यांनी या निवड प्रक्रियेबाबत आक्षेप घेतला होता. या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी संदीप अपार होते. याबाबतची तक्रार विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी १३ मार्च रोजी घेण्यात आलेल्या विषय समितीच्या निवडणुकीबाबत प्रस्तुत अपीलचा निकाल लागेपर्यंत जैसे थेचा आदेश पारित केला आहे.
पान ३