शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश कागदावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 22:46 IST

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रवेशबंदीच्या आदेशानंतरही भातकुली तालुक्यातील गावांमध्ये झालेली परप्रांतीय मेंढपाळांच्या घुसखोरीला ब्रेक लागलेला नाही. त्यामुळे महसूल विभाग आदेश काढून मोकळा झाला. मात्र, ज्यांच्यावर कारवाईची धुरा सोपविली, ती चार ते पाच ठाण्यांची पोलीस यंत्रणा अद्यापही गावांकडे फिरकली नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपोलीस अंमलबजावणी करेनात : परप्रांतीय मेंढ्यांची घुसखोरी सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रवेशबंदीच्या आदेशानंतरही भातकुली तालुक्यातील गावांमध्ये झालेली परप्रांतीय मेंढपाळांच्या घुसखोरीला ब्रेक लागलेला नाही. त्यामुळे महसूल विभाग आदेश काढून मोकळा झाला. मात्र, ज्यांच्यावर कारवाईची धुरा सोपविली, ती चार ते पाच ठाण्यांची पोलीस यंत्रणा अद्यापही गावांकडे फिरकली नसल्याचे चित्र आहे.भातकुली तालुक्यातील ५० पेक्षा अधिक गावांमध्ये परजिल्ह्यांसह परप्रांतीय शेळया-मेंढ्या स्थानिकांची शेती व चारा फस्त करीत आहेत. तालुका आणि उपविभागीय अधिकाºयांच्या आदेशाला तिलांजली मिळाल्याने त्रस्त ग्रामस्थांनी स्वत: पुढाकार घेऊन शेळ्या-मेंढ्या पकडून कोंडवाड्यात टाकण्यास सुरुवात केली आहे.शेतकºयांचे नुकसान व रक्तरंजित संघर्ष टाळण्यासाठी काठेवाडींकडील चराईसाठी येणाºया जनावरांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी विनोद शिरभाते यांनी २९ जानेवारी रोजी आदेश काढले. ही प्रवेशबंदी १५ मार्चपर्यंत अस्तित्वात राहील. तथापि, ते आदेश अद्यापही कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. भातकुली तालुक्यातील सायत, निंभा, हरताळा, भातकुली, गणोरी, गणोजा, गोपगव्हाण, हातुर्णा, सातुर्णा, अळणगाव, कुंड व लगतच्या अन्य गावांत जिल्ह्याबाहेरून लाखावर शेळ्या- मेंढ्या चराईसाठी आल्या आहेत. आधीच दुष्काळ असताना बाहेरील मेंढ्यांनी जंगल फस्त करणे सुरू केले आहे. त्या शेळ्या- मेंढ्या नव्याने केलेल्या वृक्षारोपणावर ताव मारत असल्याने ही घुसखोरी थांबवावी, अशी विनंती सायतचे सरपंच अनिल वर्धे यांनी तहसील व पोलीस प्रशासनाकडे केली. त्यांच्या पत्राची दखल घेत तिवसा-भातकुलीच्या एसडीओंनी प्रवेशबंदी केली. मात्र, १^^६ फेब्रु्रवारी रोजीसुद्धा सायत, अळणगाव, खारतळेगाव, खोलापूर, विर्शी, गोपगव्हाण, वासेवाडीलगत गावांत परप्रांतीयांच्या हजारो शेळ्या-मेंढ्या धुडगूस घालीत आहेत. आता पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.सरपंच अनिल वर्धे यांनी शनिवारी सायतमधील काठेवाडींच्या शेळ्या-मेंढ्या गावाबाहेर हाकलत त्यांना कोंडवाड्यात बंदिस्त केले.पोलिसांकडून हवी कारवाईबाहेरील सर्व जनावरांना भातकुली तालुक्यात प्रवेशबंदी घातल्याची माहिती भातकुलीसह वलगाव, खोलापूर, बडनेरा, आसेगाव पूर्णा व लोणी पोलिसांना देण्यात आली आहे. भातकुली तालुक्यातील गावे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. प्रवेशबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. प्रत्यक्षात पोलिसांकडून फारशी कारवाई होत नसल्याने आणि ग्रामस्थ त्या मेंढ्या गावातून हद्द पार करू लागल्याने नवा वाद पेटण्याची भीती निर्माण झाली आहे.भातकुली तालुक्यातील ज्या गावांमधून तक्रारी प्राप्त झाल्यात, त्या गावात शिरलेल्या मेंढपाळांच्या मुखियांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नोटीस बजावण्यात आल्या. अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेत.- पंकज दाभाडेप्रभारी ठाणेदार, भातकुलीस्थानिक आणि परप्रांतीय मेंढपाळांतील संघर्ष टाळण्यासाठीच बाहेरील व काठेवाडी गुराढोरांना तालुक्यात प्रवेशबंदी घातली आहे. कारवाई व अंमलबजावणीसाठी आदेशाच्या प्रती संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना पाठविल्यात.- विनोद शिरभाते, एसडीओ