शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताक दिनी ‘स्टंट राईडर्स’चा धुमाकूळ

By admin | Updated: January 28, 2017 00:17 IST

प्रजासत्ताक दिनानिमित्त यावेळीही शहरात ‘स्टंट रायडर्स’ तरूणांचा धुमाकूळ पाहायला मिळाला.

अमरावती : प्रजासत्ताक दिनानिमित्त यावेळीही शहरात ‘स्टंट रायडर्स’ तरूणांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. पोलिसांच्या डोळ्यांदेखत दुचाकीवर जिवघेण्या कसरती करणारे तरूण, हाती तिरंगा घेऊन केली जाणारी जोरदार घोषणाबाजी व कर्णकर्कश्श हॉर्न वाजवून तरुणांनी अक्षरश: धिंगाणा केला. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन केले. याप्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस विभागाने तब्बल २५० वाहनांवर कारवाईचा बडगा उगारत १० वाहने ‘डिटेन’ केली असून दीडशे दुचाकीस्वारांकडून तब्बल ५३ हजारांचा दंड वसूली केला. अपघाताची शक्यताअमरावती : प्रजासत्ताक दिनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही तरूणाईने विना परवाना दुचाकी रॅली काढल्या. प्रजासत्ताक दिनी सगळीकडे उत्साहाचे वातावरण असताना शहरातील विविध मार्गांवर दुचाकीस्वारांच्या टोळ्या ‘धूम स्टाईल’ भरधाव वाहने पिटाळताना दिसून आल्या. कर्कश्श हॉर्नमुळे कानठळ्या बसत होत्या. या स्थितीत अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि ध्वनीप्रदूषणाचा कहर झाला. या बेधुंद तरूणांना आवरताना पोेलिसांच्या नाकीनऊ आले होते. मात्र, पोलिसांनी तरूणाईचा हा धुमाकूळ कॅमेराबद्ध करून त्यांना ताब्यात घेतले. शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमबाह्य वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तब्बल २५० दुचाकीस्वारांवर कारवाई केली तर ट्रीपल सिट ४६ दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली असून ‘रॅश ड्रायव्हिंग’करणाऱ्या १० दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या होत्या. (प्रतिनिधी)