शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सीएमपी प्रणालीवर झेडपीच्या अभ्यास गटाची स्टडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:10 IST

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत १४ तालुक्यांमध्ये जवळपास ५,९३२ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांचे वेतन दरमहा ऑफलाईन ...

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत १४ तालुक्यांमध्ये जवळपास ५,९३२ प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यांचे वेतन दरमहा ऑफलाईन पद्धतीने होत आहे. डोकेदुखी ठरणारी ही प्रक्रिया बदलून यापुढे शिक्षकांचे वेतन ऑनलाईन सीएमपी प्रणालीने सुरू करण्याच्या अनुषंगाने शिक्षण सभापतींच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय अभ्यास समिती २२ जून रोजी जालना जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या सीएमपी प्रणालीचा विस्तृत अभ्यास केला. त्यानुसार सीएमपी प्रणाली आता स्थानिक जिल्हा परिषदेत सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचे वेतन जालना, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सीएमपी प्रणालीद्वारे अदा केले जात आहे. त्यामुळे सीएमपी प्रणालीची माहिती जाणून घेण्यासाठी अमरावती जिल्हा परिषदेचे शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती सुरेश निमकर यांच्या अध्यक्षतेखाली उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्ता फिसके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एजाज खान यांच्यासह १० जणांची अभ्यास समितीने नुकतीच जालना जिल्हा परिषदेला भेट देऊन या ठिकाणी सीएमपी प्रणालीद्वारे शिक्षकांचे वेतन कशा पद्धतीने अदा केले जाते, याची विस्तृत माहिती जाणून घेतली. सीएमपी प्रणालीसंदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांनी जालना सीएमपी उपक्रमाचा प्रवास व प्रणालीचे फायदे याची इंत्थंभूत माहिती अभ्यास समितीसमोर विशद केली. उप मुख्य लेखा वित्त अधिकारी पुंडगे, उपशिक्षणाधिकारी खरात, विस्तार अधिकारी सोळंके, कॅशियर सिरसाठ, भाऊसाहेब काकडे आदींनी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अन्य लाभही सीएमपी प्रणालीद्वारे दिले जातात. त्यासाठी काय उपाययोजना, कामकाज करण्याची पद्धत याबाबतही विस्तृत माहिती अभ्यास समितीने जाणून घेतली.

बॉक्स

सीएमपी प्रणाली येणार का अंमलात?

जालना जिल्हा परिषदेमार्फत शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अन्य लाभ देण्याची सर्व प्रक्रिया ही आरटीजीएसद्वारे संबंधिताच्या खात्यात जमा केली जाते. त्यामुळे मध्यल्या टेप कमी होऊन कर्मचाऱ्यांना वेळेवर आपल्या हक्काचा लाभ मिळतो. त्यामुळे सीएमपी प्रणालीची प्रक्रिया जिल्हा परिषदेत अभ्यास समितीच्या दौऱ्यानंतर राबविली जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोट

सीएमपी प्रणालीची विस्तृत माहिती जाणून घेतली. या प्रणालीच्या माध्यमातून वेतनासह निवृत्तीचे लाभ, कंत्राटदराची देयके अदा केली जातात. अतिशय चांगली ही प्रक्रिया आहे. सदर प्रक्रिया राबविण्यासाठी अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात सीएमपी प्रणाली येथील झेडपीत सुरू केली जाईल.

सुरेश निमकर

सभापती तथा अभ्यास समिती प्रमुख