'लोकमत'चा उपक्रम : अॅस्पायर एज्युकेशन फेअर १२ जूनपासूनअमरावती : शाळेचा अभ्यास संपला. आता उच्च माध्यमिक शिक्षणाची तयारी जी चांगल्या भविष्याकडे नेणारी असावी. परंतु किती टक्के गुणांवर कोणता अभ्यासक्रम निवडावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती, वर्षाला किती शुल्क भरावे लागणार, अनुदान मिळेल काय, असे अनेक प्रश्न सध्या पालकांच्या मनात संभ्रम निर्माण करीत असतील. आता मात्र आपल्या पाल्याच्या भावी करिअरची चिंता करणे सोडा, कारण खास आपल्यासाठी विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती प्रोफेसर राम मेघे इंस्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी अँड रिसर्च सेंटर, अमरावती, प्रोसेसर राम मेघे कॉलेज आॅफ, अमरावती, लोकमत अस्पाअर एज्युकेशन केअर २०१५ चे आयोजन करण्यात आले आहे. १२ ते १४ जूनपर्यंत संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन आर्ट गॅलरी अमरावती येथे हा उपक्रम घेण्यात येत आहे. यात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेतलेल्या युवकांना आपल्या मनाप्रमाणे करिअरसाठी उपयुक्त शिक्षण संस्थेची माहिती प्राप्त करणे शक्य होणार आहे. हा मेळावा पूर्णत: नि:शुल्क आणि सर्वसुविधायुक्त आहे. अॅस्पायरचे हे तिसरे वर्ष आहे. या आयोजनामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने युवा लाभान्वित होत आहेत. लोकमत युवा नेक्स्टच्यावतीने आयोजित या मेळाव्यात सहप्रायोजक सोशल आयआयटी, जेईई सत्र, युनिक अॅकॉडमीअम, न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड अमरावती यांचे सहकार्य लाभले आहे. चॅनल पार्टनर सिटी न्युज अमरावती तसेच मेळाव्यात विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती, प्रोफेसर राम मेघे इंस्टिट्यूट आॅफ टेक्नोलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बडनेरा अमरावती, युनिक अॅकॉडमीअम सोश आयआयटी, जेईई अमरावती, आयआयजेटी अँड अभ्यासा इंग्लिश स्कूल अमरावती, एडीसीसी अॅकॉडमीअम पावर्डद्वारे चैतन्य टेक्नोस्कूल नागपूर, मेघे ग्रुप आॅफ इंस्टिट्यूट नागपूर, साई सायन्स अॅकॅडमी अमरावती डॉ.भाऊसाहेब नांदुरकर कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी यवतमाळ, बाबासाहेब नाईक कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पुसद, सूर्यकांता ग्रुप आॅफ इंस्टिट्यूट पुणे, नूतन महाराष्ट्र इंस्टिट्यूट अँड टेक्नोलॉजी तळेगाव, मराठवाडा मित्र मंडळ ग्रुप आॅफ पुणे, आयकॅड (आयसीएडी) अमरावती, गेट फोरम अमरावती, डी.ई. एस. कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, धामणगाव रेल्वे, प्रगती ब्रेन पॉवर इम्प्रुव्हमेंट अकोला, जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग आॅन टेक्नोलॉजी यवतमाळ, निम्स एज्युकेशन अमरावती, फुलोर अॅकॅडमी अमरावती, दि न्यु एश्योरन्स कंपनी लिमिटेड यांचे स्टॉल प्रदर्शनीस भेटीला आलेल्यांचा रोज लकी ड्रॉ काढण्यात येईल. दहावी, बारावीमध्ये ९०% पेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी लोकमत कार्यालयात करावी. अधिकाअधिक विद्यार्थ्यांनी व पालकांनी या मेळाव्याला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीकरिता संपर्क : लोकमत भवन, जिल्हा क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती. राजेश मालधुरे ९८८११२२३००, जयंत कौलगीकर : ९९२२४२७७९४ यांच्याशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी) विद्यार्थी, पालकांनी नोंद घेण्याचे आवाहनदि. १२ जूनला दुपारी ४ वाजता सुशील मेहोरात्रा, एनएलपी ट्रेनर, नवी दिल्ली यांचा करिअरचे व्यवस्थापन, सोशल मिडियाचा उपयोग करिअरसाठी कसा करावा, पॅरेटिंग इत्यादी विषयावर सेमिनार नि:शुल्क आयोजित केला आहे. विद्यार्थी तसेच पालकांनी याची नोंद घ्यावी. दि. १३ जून रोजी सकाळी १ वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन अभ्यासा शाळेतर्फे करण्यात आले आहे. दि. १४ जून रोजी सकाळी ९ वाजता सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन ८, ९, १० च्या विद्यार्थ्यांकरिता आयसीएडी तर्फे करण्यात आले आहे.
विद्यार्थी, पालकांची चिंता होणार दूर
By admin | Updated: June 10, 2015 00:19 IST