शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

शिक्षकांच्या बेपर्वाईमुळे विद्यार्थी बेपत्ता

By admin | Updated: April 25, 2016 00:08 IST

जि. प. शाळेतील मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षकाच्या बेपर्वाईमुळे शाळा ओस पडल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ७.२० मिनिटाला धाराकोट येथे पाहावयास मिळाला.

धाराकोट शाळेतील प्रकार : ४३ पैकी केवळ ३ विद्यार्थी, ९ विद्यार्थ्यांना एनजीओने केले हायजॅक, उर्वरित बेपत्ताधारणी : जि. प. शाळेतील मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षकाच्या बेपर्वाईमुळे शाळा ओस पडल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ७.२० मिनिटाला धाराकोट येथे पाहावयास मिळाला. त्यामुळे मेळघाटातील शिक्षक आपल्या कर्तव्यात किती दक्ष आहेत याचा अनुभवच मिळाला. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जि. प. शाळेचा कालावधी सकाळी करण्यात आले. त्यानुसार शिक्षक व मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळेत सकाळी ६.५० वाजता पोहोचण्याची व सकाळी ११.५० वाजता जाण्याची वेळ ठरविण्यात आली आहे. सकाळी ७ वाजता प्रार्थना व नंतर परिपाठ झाल्यावर ७.३० ते ११.३० पर्यंत शाळेची शिक्षणाची वेळ आहे. मात्र याकडे मेळघाटात कार्यरत मुख्याध्यापक व शिक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना किंवा अ‍ॅडजस्टमेंट करतानाचे चित्र आहे.शनिवार दि. २३ एप्रिल रोजी प्रस्तुत प्रतिनिधीने आज सकाळी ७.१५ दरम्यान जि. प. प्राथमिक शाळा धाराकोट येथे भेट दिली असता मुख्याध्यापक किराणा दुकानावर गेल्याचे व सहाय्यक शिक्षक शाळेच्या मागे टाईमपास करीत उभे होते. कार्यालय व वर्ग खोल्या उघड्या होत्या. पहिल्या वर्गात केवळ एक विद्यार्थिनी बेंचवर बसली होती तर दुसरा वर्ग रिकामा होता. नंतर आणखी दोन विद्यार्थी पोहोचले. शाळेची पटसंख्या ४३ तर वर्ग १ ते ४ चे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ९ विद्यार्थी गावातील एका घरात अपेक्षा होमिओ सोसायटीद्वारे चित्रकला काढण्यात व्यस्त होते. उर्वरीत विद्यार्थी बेपत्ता असल्याचे चित्र ७.३० पर्यंत होते. (तालुका प्रतिनिधी)शिक्षकांवर कारवाईची मागणीविद्यार्र्थ्यांना वाऱ्यावर सोडून खासगी कामात व्यस्त असणाऱ्या शिक्षकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी धारणी येथील शिस्तप्रिय नागरिकांनी केली आहे. मेळघाटात कार्यरत शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याकडे कमी लक्ष देतात आणि आपले खासगी काम तसेच गप्पा मारण्यात व्यस्त असतात असा आरोपही विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. यामुळेच शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत मेळघाटातील विद्यार्थी गुणवत्तेच्या बाबतीत मागे राहात आहे.