शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

विद्यार्थ्यांनी जाणली मूलभूत विज्ञानाची संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 22:57 IST

मूलभूत विज्ञानाचे क्षेत्र अतिशय आव्हानात्मक आणि विलक्षण बौद्धिक आनंद देणारे आहे. मूलभूत वैज्ञानिक संशोधनामध्ये विश्वातील घडामोडी कशामुळे होतात, का होतात, याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो.

ठळक मुद्दे‘थिंक शाश्वत’चे विज्ञान प्रदर्शन : बालमनाला सुलभ प्रयोगाची भुरळ

आॅनलाईन लोकमतअमरावती : मूलभूत विज्ञानाचे क्षेत्र अतिशय आव्हानात्मक आणि विलक्षण बौद्धिक आनंद देणारे आहे. मूलभूत वैज्ञानिक संशोधनामध्ये विश्वातील घडामोडी कशामुळे होतात, का होतात, याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. तोच धागा पकडून विद्यार्थ्याना मूलभूत विज्ञानाचे धडे देण्याचा संकल्प ‘थिंक शाश्वत’ ग्रुपने केला आहे. त्यासाठी शाश्वत कन्सेप्ट स्कूलने विज्ञान प्रदर्शनाची संकल्पना मांडून ते बुधवार (२२ नोव्हेंबर) पासून प्रत्यक्षात साकारले. या संकल्पनेला शहरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कॅम्प स्थित शाश्वत स्कूलच्या आवारात बुधवारी दुपारी जि.प. शिक्षण सभापती जयंत देशमुख यांनी या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन केले. शहरातील खासगी शाळेतील विद्यार्थ्यांच्या खांद्यास खांदा लावून जि.प. शाळांमधील विद्यार्थ्यांनी साकारलेले शंभराहून अधिक मूलभूत विज्ञानाचे प्रयोग लक्षवेधक ठरले. मूलभूत विज्ञान कधीच टाकाऊ नसते, हे वेैश्विक पटलावर सिद्ध झाले आहे. त्याअनुषंगाने मंदिरातील घंटानाद का करतो, मानवप्राण्यांचे हृदय कसे धडधडते, जनरेटरमधून वीजनिर्मिती नेमकी कशी होते, याचे उत्तर या प्रदर्शनातून अगदी सोप्या व सुलभ पद्धतीने देण्याचा स्तुुत्य प्रयत्न करण्यात आला आहे. विविध शाळांमधून आलेले शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सान-थोरांना मूलभूत ‘कोअर’ सायन्सचे धडे दिलेत. २५ नोव्हेंबरपर्यंत हे विज्ञान प्रदर्शन सकाळी ११ ते ७ या वेळेत अमरावतीकरांना अनुभवता येणार आहे.प्रदर्शनाला खासकरून उपस्थित असलेले होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे निवृत्त वैज्ञानिक आनंद घैसास यांनी विज्ञानाचे प्रयोग साकारणाºया विद्यार्थ्यांशी आत्मीय संवाद साधला. शिक्षणाधिकारी नीलिमा टाके, उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव धनंजय धवड, प्रसिध्द मूर्तिकार अतुल जिराफे, गणेश वºहाडे यांनी भेट दिली. श्रीकांत बाभूळकर, सचिन सावळे, पंकज उभाड, प्रशांत खोपेकर, शाश्वत शाळेचे संचालक अतुल गायगोले, अमृता गायगोले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सेवानिवृत्त वनकर्मचारी सेवक संघाचा ५० पेक्षा अधिक औषधीयुक्त वनस्पतींचा स्टॉलही लक्षवेधक ठरला.हे आहेत आगळेवेगळे प्रयोगहोल इन द हँड, पार्टिशन आॅफ व्हिजन, साऊंड फॉर्मेशन अ‍ॅन्ड फ्रिक्शन, हॉर्ट बिट, साऊंड वेव्ह्ज, सेंटर आॅफ ग्रॅव्हिटी, मिनी इलेक्ट्रिसिटी जनरेशनसह शेकडो प्रयोगाची इत्थंंभूत माहिती अत्यंत सोप्या न सुलभ भाषेतून देण्यात आली. अशा प्रकारचे विज्ञान प्रदर्शन पहिल्यांदाच अनुभवल्याची प्रतिक्रिया भेट देणाºयांनी व्यक्त केली.डिसेक्शन आॅफ हार्टबकरी आणि बकºयाच्या हृद्यातील आंतरिक भाग ‘डिसेक्शन आॅफ हार्ट’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. बकरी प्रजातीतील प्राण्यांच्या हृद्यातील आंतरिक भागांची ओळख करवून देण्यात आली. हृदयाची धडधड करणारी कार्डियाक टिश्यू, चार कप्पे, आर्टेरी दाखविण्यात आली.