इर्विनमध्ये उपचार सुरु : ‘मम्स’ व्हायरसमुळे पसरणारा संसर्गजन्य आजारअमरावती : ‘मम्स’ व्हायरसमुळे हवेतून वेगाने पसरणाऱ्या गालफुगी या आजाराची शहरातील मुलांना लागण झाली आहे. येथील महर्षी पब्लिक स्कूलमधील काही विद्यार्थ्यांचे गाल फुगल्याचे लक्षात येताच संस्थेने तातडीने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यांना गालफुगी असल्याचे स्पष्ट झाले. संस्थेच्या तत्परतेमुळे सर्व विद्यार्थ्यांवर वेळीच योग्य उपचार होऊ शकलेत. गालफुगी हा आजार हवेतून पसरत असल्यामुळे लागण झालेल्या सर्व मुलांच्या वास्तव्यासाठी संस्थेने स्वतंत्र कक्ष उभारला आहे. सर्दी, खोकल्याने बाधित विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गालफुगीने तोंड वर काढले आहे. गोवर, टी.बी या आजारांप्रमाणेच गालफुगीदेखील हवेतून पसरते. प्रमुख्याने लहान मुलांना होणाऱ्या या आजारात गाल आणि गळ्याचा भाग सुजतो. कुणालाही अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी मुलांना तातडीने उपचार द्यावेत, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना गालफुगी
By admin | Updated: December 29, 2014 23:34 IST