शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी साजरा केला अनोखा ‘प्रेमदिन’

By admin | Updated: February 15, 2016 00:39 IST

कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा हिमतीने सामना करणाऱ्या अनेक बहाद्दरांना जगण्याचे बळ मिळावे,

प्रयास सेवांकुरचा उपक्रम : कॅन्सरपीडितांच्या मदतीसाठी केले रद्दी संकलन अमरावती : कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा हिमतीने सामना करणाऱ्या अनेक बहाद्दरांना जगण्याचे बळ मिळावे, उपचारांकरिता थोडीफार आर्थिक मदत मिळावी, या उदात्त हेतुने अंबानगरीतील निवडक तरुणांनी एकत्र येऊन ‘प्रयास सेवांकुर’ संस्थेच्या माध्यमातून शहरातील प्रमुख चौकात रद्दी संकलित केली. ही रद्दी विक्री करून त्यातून कॅन्सरबाधितांना मदत केली जाणार आहे. ‘मानव प्रेम दिन’ अशी संकल्पना घेऊन ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यात आली. या उपक्रमांतर्गत हजारो किलो रद्दी गोळा झाली. महाविद्यालयीन तरुण एकत्रअमरावती : व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. एकीकडे अंबानगरीची तरुणाई हॉटेल्स, चित्रपटगृहे, कॉफी शॉप, आईस्क्रीम सेंटर व उद्याने आदी ठिकाणी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करीत असताना ‘प्रयास सेवांकुर’ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अविनाश सावजी यांच्या विचारांनी प्रभावित प्रभावित जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाच्या तरूण-तरुणींनी एकत्र येऊन कॅन्सरपीडित गरजू रूग्णांसाठी हा आगळा उपक्रम राबविला. रविवारी सकाळपासूनच सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शहरातील अनेक प्रभागातून रद्दी गोळा केली. यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना समुपदेश केले. या उपक्रमामागील उदात्त हेतू समजावून सांगितला. विद्यार्थ्यांनी दुपारी ३ वाजता इर्विन चौकातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रद्दीचे गठ्ठे बांधले. ही रद्दी विकल्यानंतर यातून जी रक्कम जमा होईल ती प्रयास सेवांकुर केअर फंडात जमा केली जाणार आहे. त्याअंतर्गत कॅन्सरपीडित गरजू व्यक्तींना मदत दिली जाईल. विशेषत: प्रयास सेवांकुर सामाजिक संघटनेच्या अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, जळगाव आदी ठिकाणी शाखा असून रविवारी सर्वच ठिकाणी हा उपक्रम एकाचवेळी राबविण्यात आला. डॉ.अविनाश सावजी यांच्या मार्गदर्शनाखाली छोटू काका वरणगावकर, स्नेहारिका शिरभाते, मोनाली यावले, हृषीकेश नरखेडे, आश्विनी गुडधे, रंजना नांदुरकर, अश्विन सव्वालाखे, प्रकाश तराळ यांच्यासह शेकडो तरुण-तरुणींनी या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी महसूल उपायुक्त रवींद्र ठाकरे यांनी या उपक्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कार्याची स्तुती केली.