शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी, पोलिसांनी जाणून घेतली फॉरेन्सिक लॅबची कार्यपद्धती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:44 IST

न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील कार्यपद्धतीची जनजागृती करण्यासाठी 'फॉरेन्सिक अवेअरनेस वीक'चे आयोजन करण्यात आले आहे. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या जनजागृती कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी व पोलिसांना प्रादेशिक न्यायसहायक वैत्रानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे मार्गदर्शन करीत आहेत.

ठळक मुद्देजनजागृती सप्ताह : न्यायवैद्यक प्रयोगशाळा उपसंचालकांचे मार्गदर्शन

ऑनलाईन लोकमतअमरावती : न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील कार्यपद्धतीची जनजागृती करण्यासाठी 'फॉरेन्सिक अवेअरनेस वीक'चे आयोजन करण्यात आले आहे. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या जनजागृती कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी व पोलिसांना प्रादेशिक न्यायसहायक वैत्रानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे मार्गदर्शन करीत आहेत.'फॉरेन्सिक अवेअरनेस वीक'मध्ये पोलीस तपासात फॉरेन्सिकचे महत्त्व व पोलिसांनी कशाप्रकारे काम करावे, याबाबत ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्वच्छ व सुंदर प्रयोगशाळेतील कार्यपद्धतीविषयी माहिती त्यांनी दिली. चार दिवस चालणाऱ्या या जनजागृती सप्ताहात शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे २५० विद्यार्थी, नरसम्मा महाविद्यालयाचे बीएस्सी फायनलचे १०० विद्यार्थी, अकोला येथील बीएएमएसचे ७० विद्यार्थी, शिवाजी विज्ञानचे एमएस्सीचे ६० विद्यार्थी, विद्यापीठातील एमएस्सीचे ६० विद्यार्थी व विद्याभारती महाविद्यालयातील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. सोबत या सर्व महाविद्यालयांतील शिक्षक वृंदानेही फॉरेन्सिकची लॅब कार्यपद्धती जाणून घेतली. शहर पोलीस आयुक्तालयातील ३९ व अमरावती ग्रामीण क्षेत्रातील २० पोलीस अधिकाऱ्यांनाही त्यांच्या तपासाकार्यासाठी फॉरेन्सिक लॅबमधील कार्यपद्धतीची माहिती जाणून घेतले. शुक्रवारी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अकोला येथील फॉरेन्सिक सायन्सचे विद्यार्थी व इंजिनीअरिंगचे विद्यार्थी उपस्थित राहणार असून, त्यांना उपसंचालक विजय ठाकरे फॉरेन्सिकच्या कार्यप्रणालीची माहिती देणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा असणाऱ्या या प्रयोगशाळेची माहिती जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. वर्षभर या प्रयोगशाळेत प्रवेशबंदी असत. आतादेखील केवळ जनजागृती करण्याच्या दृष्टीने या प्रयोगशाळेत प्रवेश देण्यात आला आहे.‘फॉरेन्सिक अवेअरनेस वीक'मध्ये विद्यार्थी व पोलिसांना फॉरेन्सिकच्या कार्यपद्धतीविषयी माहिती देण्यात आली. फॉरेन्सिक लॅबचे महत्त्व सर्वांना परिचित व्हावे, या अनुषंगाने शासनाचा हा उपक्रम आहे.- विजय ठाकरे, उपसंचालक, न्यायवैद्यक प्रयोगशाळा