शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळखुटा येथील दत्तप्रभू आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 18:39 IST

धारणी प्रकल्प कार्यालय अंतर्गत पिंपळखुटा येथील दत्तप्रभू माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेत सातव्या वर्गात शिशुपाल हा शिक्षण घेत होता.

परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील श्री दत्तप्रभू अनुदानित आश्रमशाळेत शिकणाºया एका विद्यार्थ्याचा शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेने अनुदानित आश्रमशाळांतील कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिशुपाल सुनील बेलसरे (१३, रा. चौºयामल) असे मृताचे नाव आहे.

धारणी प्रकल्प कार्यालय अंतर्गत पिंपळखुटा येथील दत्तप्रभू माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेत सातव्या वर्गात शिशुपाल हा शिक्षण घेत होता. तीन-चार दिवसांपासून पोटदुखीचा त्रास झाल्याने त्याला धामणगाव गढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. थोडे बरे वाटल्यावर त्याला सुट्टी देण्यात आली. परत त्याच दिवशी सायंकाळी त्रास वाढल्याने त्याला धामणगाव गढी प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र, उपजिल्हा रुग्णालयाच्या वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने आश्रमशाळा प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे. उपचारापूर्वीच शिशुपालची प्राणज्योत मालविल्याचे  वैद्यकीय अधिकारी अशोक जुमळे यांनी सांगितले. नेत्यांच्या शाळांमध्ये  बेजबाबदारीचा कळसमाजी राज्यमंत्री वसुधा देशमुख अध्यक्ष असलेल्या पीपल्स वेलफेअर सोसायटी अंतर्गत पिंपळखुटा येथील श्री दत्तप्रभू आश्रमशाळा चालविली जाते. मात्र, आश्रमशाळा संहितेनुसार येथे व्यवस्था नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे मेळघाटसह इतर नेत्यांच्या आश्रमशाळा आदिवासी विद्यार्थ्यांना जीवघेणा ठरत आहेत. 

सदर प्रकरण वाढू नये, यासाठी दिवसभर राजकीय स्तरावर हालचाली सुरू होत्या. यादरम्यान शिशुपाल बेलसरे या विद्यार्थ्याच्या मृत्यूची चौकशी आणि संबंधित शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी आदिवासी पालकांनी केली आहे. त्रिसदस्यीय समिती करणार चौकशीआदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास  प्रथम चौकशीची जबाबदारी प्रकल्प अधिकारी, तहसीलदार आणि  तालुका वैद्यकीय अधिकाºयांची असते. त्यानुसार ही त्रिसदस्यीय समिती शिशुपाल बेलसरेच्या मृत्यूची कारणमीमांसा करणार आहे.

 

पिंपळखुटा आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यूची त्रिसदस्यीय समिती तात्काळ चौकशी करेन. त्यानंतरच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.- सुशीलकुमार खिल्लारे, प्रभारी प्रकल्प अधिकारी, धारणी