कोरडवाहू क्षेत्राला उपयुक्त : गोडे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे संशोधनअमरावती : शेतीची मशागत कमी वेळेत, कमी घामात, कमी खर्चा होण्यासाठी येथील राजेंद्र गोडे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च संस्थेच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ‘ट्रॅक्टर आॅपरेटेड स्टोन कलेक्टर यंत्राचे निर्माण केले आहे. कोरडवाहू शेतीसाठी हे यंत्र उपयुक्त आहे. यामुळे शेतीच्या कामाला गती येणार आहे. पारंपरिक शेती करताना विशेष करुन कोरडवाहू शेतीत पेरणीपूर्व शेतकऱ्यांना शेती पेरणी लायक करण्यासाठी मशागत करावी लागते. त्यापूर्वी शेतातील कचरा, तण व लहान मोठी दडगे ही मनुष्यबळाचा वापर करुन मातीपासून वेगळी करावी लागतात. सद्यस्थितीत बाजारात पेरणी, फवारणी, कापणीसाठी अनेक यंत्रे उपलब्ध आहेत. परंतु शेतातील मातीपासून दगडे वेगळी करण्याचे कोणतेच यंत्र उपलब्ध नव्हते. परंतु आता पॉवर आॅपरेटेर स्टोन कलेक्टर’ यंत्राच्या संशोधनामुळे शेतकऱ्यांचा श्रम, वेळ व पैसा वाचणार आहे. तसेच शेतामधील दगडामुळे रोटारोटरचे नुकसान देखल टळणार आहे. याच यंत्रात थोडाफार बदल करुन बटाटे, गांजर, भुईमूग, कांदे , लसून अशा पिकांची वेचणी सुद्धा करता येणे शक्य होणार आहे. अशा प्रकारचे निर्माण व संशोधन विद्यार्थ्यांनी केले आहे. संस्थेचे संचालक व्ही.टी. इंगोले यांच्या मार्गदर्शनात मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांच्या सहकार्याने हे यंत्र निर्माण केले आहे. या यंत्रामुळे जिल्ह्यातील जिरायती क्षेत्रातील शेतजमिनीच्या मशागतींचा वेग वाढणार असून कमी श्रमात अधीक काम होणार आहे. (प्रतिनिधी)यंत्र असे करते कार्यया यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे यंत्र तीन भागात काम करते. त्यामध्ये शेतातील जमिनीच्या १५ ते २५ सेमी आतील दगड, कचरा व अनावश्यक गोष्टी मातीपासून वेगळी करुन दुसऱ्या यंत्रात जमा केली जाते. त्या यंत्रामधून ती दगडे ट्रॅक्टरच्या हायड्रोलिकद्वारा दुसऱ्या ठिकाणी नेता येतात व हे काम करण्यासाठी फक्त एका हायड्रोलिक ट्रॅक्टरची व त्याच्या चालकाची गरज भासणार आहे.
विद्यार्थ्यांनी बनविले ‘ट्रॅक्टर आॅपरेटेड स्टोन कलेक्टर’
By admin | Updated: October 3, 2015 00:13 IST