शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

महापौरांच्या दालनात ठिय्या

By admin | Updated: December 31, 2015 00:09 IST

येथील सायन्सकोर मैदानावर जागोजागी खड्डे पडले असताना ते दुरुस्त करण्यात येत नसल्याच्या कारणामुळे लार्ड बुद्धा मैत्री संघाच्या कार्यकर्त्यानी चक्क ....

सायन्सकोर मैदानाचा विषय : कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा अमरावती : येथील सायन्सकोर मैदानावर जागोजागी खड्डे पडले असताना ते दुरुस्त करण्यात येत नसल्याच्या कारणामुळे लार्ड बुद्धा मैत्री संघाच्या कार्यकर्त्यानी चक्क महापौरांच्या दालनात बुधवारी तासभर ठिय्या आंदोलन केले. अखेर या प्र्रकरणी महापौर चरणजित कौर नंदा यांना हस्तक्षेप करावा लागला. दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. लॉर्ड बुद्धा मैत्री संघाच्या वतीने येथील सायन्सकोर मैदानावर १ ते ३ जानेवारी दरम्यान भिमाकोरेगाव विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या मैदानावर जागोजागी खड्डे पडले असताना ते दुरुस्त करण्यासाठी रोड रोलरची सतत मागणी करण्यात आली. एवढेच नव्हे तर सायन्सकोर मैदानावर पडलेल्या खड्ड्यांबाबत महापौरांच्या स्वीय सहायकांनी अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांशी सतत संपर्क साधला. मात्र महापौर कार्यालयातून जाणाऱ्या संदेशाला देखील कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा आरोप लार्ड बुद्धा मैत्री संघाने केला. सायन्सकोर मैदानावर अन्य संघटनांच्या होणाऱ्या कार्यक्रमांना महापालिका प्रशासन आवश्यक त्या सुविधा पुरवितात. परंतु दरवर्षी भिमाकोरेगाव विजयस्तंभाला मानवंदना देणाऱ्या कार्यक्रमाप्रसंगी प्रशासननकडून सतत नकारात्मक भूमिका घेतली जाते, असा आरोप करण्यात आला. यावेळी महापालिका कर्मचाऱ्यांच्या नकारात्मक कामकाजाचा पाढा वाचताना दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय महापौरांचे दालन सोडणार नाही, अशी भूमिका लॉर्ड बुद्धा मैत्री संघाच्या कार्यकर्त्यानी घेतली. यावेळी महापौर चरणजित कौर नंदा, नगरसेवक अजय गोंडाने, निलिमा काळे, उपायुक्त चंदन पाटील आदींनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक भूमिकेवर ठाम होते. त्यामुळे अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे, निरिक्षक उमेश सवाई यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय महापौर नंदा यांच्या निर्देशानुसार उपायुक्त चंदन पाटील यांनी घेतला. ठिय्या आंदोलन करताना कैलास मोरे, साहिल वानखडे, रवी गवई, लता खंडारे, नलिनी मेश्राम, सुमती गवई, संगीता जेठे, निर्मला गजभिये, सुनंदा भिलावे आदी उपस्थित होते.