शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्तीच्या अध्यक्षाला मारहाण

By admin | Updated: January 25, 2017 00:18 IST

पेठइतबारपूर येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय महादेव हांडे यांना दर्यापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत दोन पोलीस शिपायांनी मारहाण केल्याप्रकरणी ...

रेतीच्या वाहतुकीचे प्रकरण : पोलीस ठाण्यासमोर उपोषण, कारवाईची मागणीदर्यापूर : पेठइतबारपूर येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय महादेव हांडे यांना दर्यापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत दोन पोलीस शिपायांनी मारहाण केल्याप्रकरणी सदर पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, याकरिता संजय हांडे बुधवारपासून पोलीस स्टेशनच्या समोरच आमोरण उपोषणाला बसले आहे. काही दिवसांपूर्वी पेठइतबारपूर येथील संजय हांडे यांना येथे पोलीस शिपाई तुषार गावंडे व गजानन दाभणे विनाकारण मारहाण केल्याची तक्रार हांडे यांनी ठाणेदार व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे दिली आहे. पण याची चौकशी न करता वरिष्ठांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे पदाचा दुरुउपयोग करून सदर पोलिसांना हांडे यांना अमानुषपणे मारहाण केली असल्याची तक्रार त्यांनी वरिष्ठांना दिली. न्याय मिळण्यासाठी २४ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांची ताराबंळ उडाली आहे. ३० डिसेंबरच्या रात्री हांडे नाव लिहिलेला असलेला रेतीचा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला. येथून काही नागरिक रेतीमाफिया अवैध उत्खन्न करून रेतीची वाहतूक करतात. सदर तस्करी ही पोलिसांच्या आशीर्वादामुळेच होत असल्याने याला हांडे यांनी विरोध केला असता, त्याला पोलीस ठाण्यामध्ये बोलावून पैशाची मागणी करण्यात आली. त्यानंतर अवैध उत्खन्नाला विरोध करशील तर बघ, असे धमकावून मारहाण केल्याचे संजय हांडे यांनी पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारकर्ता हांडेसह पाच जणांविरुद्ध रेती प्रकरणाचे गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणात ठाणेदार दर्यापूर यांनी तक्रारकर्ता व सदर दोन पोलीसांचे बयानही नोंदविले होते. पण २० ते २२ दिवसापासुन कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे हांडे यांनी आमोरण उपोषण सुरु केले आहे. (तालुका प्रतिनिधी)मी गावाचा तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष आहे. गावातील अवैध रेतीच्या वाहतुकीला विरोध केल्याने मलाच खोटे गुन्ह्यात अडकवून मारहाण करण्यात आली व पैशाची मागणी केली. त्या ट्रॅक्टरवर हांडे नाव लिहिले होते. पण, माझा नव्हता. याप्रकरणी मला न्याय द्या. - संजय हांडे, उपोषण कर्ता