शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणुकीच्या मुद्यावरुन येवद्यात तणाव; एसपी डेरेदाखल

By admin | Updated: September 19, 2016 00:09 IST

गणेश विसर्जनावरून निर्माण झालेला तणाव अखेर रविवारी निवळला. गावातील दोन्ही धर्माच्या नागरिकांनी दाखविलेले सामंजस्य, ...

अखेर झाले विसर्जन : पोलिसांच्या भूमिकेला गावकऱ्यांचा विरोध येवदा : गणेश विसर्जनावरून निर्माण झालेला तणाव अखेर रविवारी निवळला. गावातील दोन्ही धर्माच्या नागरिकांनी दाखविलेले सामंजस्य, पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीमुळे या प्रकारावर पडदा पडला. स्थानिक एका गणेशोत्सव मंडळाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष होते. मागील ७५ वर्षांपासून या मंडळाची विसर्जन मिरवणूक येथील छोट्या मशिदीजवळून काढली जाते. इतकेच नव्हे तर गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांचा मुस्लिम समुदायाच्यावतीने गौरवदेखील केला जातो. मात्र, यावेळी पोलिसांनी मशिदीसमोरून एकाचवेळी नऊ गणपती नेण्यास परवानगी नाकारली. मंडळाजवळ एकाच गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची परवानगी असल्याने अन्य आठ गणपती मशिदीसमोरुन जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका पोलिसांनी घेतली. उलटपक्षी मंडळही भुमिकेवर ठाम राहिले. या मंडळाचे नऊही गणपती मशिदीसमोरूनच जातील, अशी भूमिका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. पोलीस आणि मंडळांचे पदाधिकारी आपापल्या भूमिकेवर अडून राहिल्याने गावात तणावाचे वातावरण होते. वास्तविक शनिवारीच या मंडळाची विसर्जन मिरवणूक निघणार होती. मात्र, तोडगा न निघाल्याने रविवारी लोकप्रतिनिधींना मध्यस्थी करावी लागली. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलीस अधीक्षक लखमी गौतम येवद्यात डेरे दाखल झाले. शनिवारी निघालीच नाही मिरवणूकयेवदा : या वादावर शनिवारी रात्री ९ वाजेपर्यंत कोणताच तोडगा न निघाल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे नऊही गणपती पोेलिसांच्या स्वाधिन केले आणि ते घराकडे परतले. परिणामी विसर्जन मिरवणूक शनिवारी निघालीच नाही. गावकऱ्यांमध्ये असंतोष व तणावजन्य स्थिती पाहता रविवारी पहाटेपासूनच गावात पोलिसांचा ताफा व अतिरिक्त कुमक तैनात झाली. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. हिंदू व मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम स्वत: येवदा येथे तळ ठोकून होते. येवदा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेश पिंपळकर यांनीदेखील संवेदनशील स्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केलेत. इतकेच नव्हे, तर संवेदनशील स्थिती लक्षात घेऊन अकोटचे आ.प्रकाश भारसाकळे, दर्यापूरचे आ. रमेश बुंदिले, तहसीलदार राहुल तायडे, उपविभागीय अधिकारी, दर्यापूर इब्राहिम चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी हिरे, सरपंच प्रदीप देशमुख, उपसरपंच नईम जमादार, माजी सरपंच बाळासाहेब राऊत, माजी सरपंच संतोष तिडके, गजानन वाकोडे, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेखा ठाकरे, सुनील डिके, विजय मेंढे, अरूणा गावंडे, अतुल गोळे, धारणी उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. अखेर एसपी लखमी गौतम यांनी गावातील हिंदू व मुस्लिम समाजातील प्रमुख मान्यवरांच बैठक घेऊन चर्चा केली. चर्चेदरम्यान पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी ग्रामपंचायतीकडून मशिदीसमोरून मिरवणूक काढण्याची लेखी परवानगी घेतल्यानंतर ही मिरवणूक कडेकोट बंदोबस्तात पार पडली. (वार्ताहर)गावकऱ्यांनी ठेवले गाव बंदमशिदीसमोरून एकाच वेळी नऊ गणपतींची मिरवणूक नेण्यास पोलिसांनी मज्जाव केल्यानंतर गावकऱ्यांमध्ये सुप्त असंतोष होता. गणपती पोलिसांच्या हवाली करून शनिवारी गावकरी घरी परतले. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळपासूनच गावकऱ्यांनी या निषेधार्थ स्वयंस्फूर्त बंद ठेवला होता. गावाला पोलीस छावणीचे स्वरूपयेवदा हे गाव पूर्वीपासूनच संवेदनशिल म्हणून गणले जाते. यावेळीही गणपती विसर्जनाच्या मुद्यावरून तणाव निर्माण झाल्याने कोणताही अनर्थ घडू नये, यासाठी गावात पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात होती. अमरावती राखीव पोलीस दल, दर्यापूर, खल्लार व चिंचोली पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.