शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांची तृष्णा भागवण्याची ‘त्या’ची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:43 IST

वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावानजीक येत असल्याच्या घटना उन्हाळ्यात वारंवार निदर्शनास येतात. त्यामुळे बरेचदा मानवाशी त्यांचा संघर्ष होतो. त्यांच्याच परिसरात त्यांच्या तृष्णातृप्ती झाल्यास ही परिस्थिती उद्भवणार नाही, याचे भान राखून मोखड येथील युवकाने डोंगरात पाणवठे तयार करून पखालीने त्यात पाणी भरत असतो.

ठळक मुद्देपखालीने पाणी : आदर्श ग्राम मोखड येथील युवकाचा स्तुत्य उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कमोखड : वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावानजीक येत असल्याच्या घटना उन्हाळ्यात वारंवार निदर्शनास येतात. त्यामुळे बरेचदा मानवाशी त्यांचा संघर्ष होतो. त्यांच्याच परिसरात त्यांच्या तृष्णातृप्ती झाल्यास ही परिस्थिती उद्भवणार नाही, याचे भान राखून मोखड येथील युवकाने डोंगरात पाणवठे तयार करून पखालीने त्यात पाणी भरत असतो.पंकज पवार असे या अवलीया तरुणाचे नाव आहे. मोखड शेतशिवाराला लागून पडीक जमीन असून, या भागात जंगली वन्यप्राण्याचे वास्तव्य आहे. रखरखत्या उन्हात पिण्याकरिता पाणी नसल्याने पाण्याच्या शोधात त्यांची भटकंती होते. त्या मुक्या प्राण्यांची तहान भागविण्याची कल्पना या तरूणाला आली. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत हे गाव सहभागी झाले आहे. त्यामध्ये श्रमदान केल्यानंतर या भागात खडकावर पाणवठे खोदून, पाणवठ्यात प्लास्टिक पन्नीचे आच्छादन टाकून त्यात तो कावडीने पाणी आणून टाकतो. भरउन्हात हा युवक मुक्या प्राण्यांची तहान भागवत असून, पाणवठ्यावर वन्यप्राणी पाणी पिऊन तृप्त होतात, हे विशेष. डोंगराळ भागात खडकाशी भिडून हा युवक पाणवठा तयार करतो. १ ते २ किलोमीटरपर्यंत पायी चालत पखालीने पाणी आणून पाणवठ्यात टाकतो. एकट्याने सुरुवात केली असली तरी आता त्याला सहकारी लाभले आहे. खोदलेल्या पाणवठ्यात पावसाचं पाणी येईपर्यंत पाणवठे भरून मुक्या वन्यप्राण्यांना पाणी पाजण्याचा त्यांचा संकल्प आहे.