शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गटविकास अधिकाऱ्यांचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 22:07 IST

परंडा (जि. उस्मानाबाद) पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाणीच्या निषेधार्थ सोमवार, २६ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

ठळक मुद्देआंदोलन : परंडा येथील बीडीओला मारहाण प्रकरणाचा निषेध

आॅनलाईन लोकमतअमरावती : परंडा (जि. उस्मानाबाद) पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाणीच्या निषेधार्थ सोमवार, २६ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.बीडीओंना मारहाणीच्या घटना कमी होण्याऐवजी हे प्रकार वाढत चालले असल्याने या घटनांचा निषेध व्यक्त करीत यासंदर्भात महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या जिल्हा शाखेने विभागीय आयुक्त पीयूष सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद यांना निवेदन दिले. महाराष्ट्र विकास सेवातील अधिकाºयांना शिवीगाळ करणे, धक्काबुकी करणे, मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. ३० जानेवारी रोजी उदगीरच्या बीडीओंना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. परंडाच्या बीडीओंंना २२ फेब्रुवारीला रस्त्यावर बेदम मारहाण करण्यात आली.काम बंदने कामकाज प्रभावितशासनाने अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. बीडीओंसह इतर मारहाणीच्या घटनांनी महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरण झाले असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना हिरीरीने राबविताना राजरोस होणारे हल्ले अत्यंत घृणास्पद व निंदाजनक असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे अमरावतीसह संपूर्ण राज्यभरात बीडीओंनी २६ फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. प्रकल्प संचालक के.एम. अहमद, अतिरिक्त सीईओ विनय ठमके, डेप्युटी सीईओ संजय इंगळे, माया वानखडे, महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेने जिल्हाध्यक्ष अरविंद गुडधे, बीडीओ बाळासाहेब अकलाडे, सागर पाटील, विनोद मेंढे, बाळासाहेब रायबोले, भास्कर रेंगळे, उमेश देशमुख, थोरात आंदोलनात सहभागी झाले.काय आहे मागणी?३३६ पंचायत समितीस्तरावर बीडीओ, सहायक बीडीओ यांना तसेच सर्व ३४ जिल्हा परिषद मुख्यालयांमध्ये संरक्षणाच्या दृष्टीने शस्त्रधारी पोलीस देण्यात यावा.राज्यात गटविकास अधिकाºयांना मारहाणीच्या घटना वाढत आहेत. परिणामी अधिकाºयांचे मनोधैर्य खच्ची होत आहे. या प्रकारांना आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठीच आम्ही काम बंद आंदोलन पुकारले आहे.- अरविंद गुडधेजिल्हाध्यक्ष, म.रा. राजपत्रित अधिकारी संघटना