शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

शकुंतलेची दुरवस्था थांबवा !

By admin | Updated: November 1, 2015 00:19 IST

मूर्तिजापूर-अचलपूरदरम्यान धावणारी शकुंतला ही दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील जनतेची जीवनवाहिनी असून तिची होत असलेली दुरवस्था थांबवा,

अन्यथा रेल रोको : दर्यापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर येणारउमेश होले दर्यापूरमूर्तिजापूर-अचलपूरदरम्यान धावणारी शकुंतला ही दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील जनतेची जीवनवाहिनी असून तिची होत असलेली दुरवस्था थांबवा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दर्यापूरच्यावतीने तालुकाध्यक्ष जयंत वाकोडे यांनी भुसावळ रेल्वे विभागीय प्रमुख गुप्ता यांचेकडे केली आहे.शकुंतला रेल्वेची सध्या दयनीय स्थिती झाली आहे. तिला सुस्थितीत आणावे, अशी मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. जनतेच्या सेवेसाठी असलेली भारतीय रेल्वे या मार्गानी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दर्यापूर येथील रेल्वे स्टेशनची अवस्था बिकट झाली असून इमारतीला भग्न स्वरूप प्राप्त झाले आहे. दिवे बंद, कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे. प्रवाशांना बसण्याची व्यवस्था नाही, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे. स्वच्छ व सुंदर रेल्वेची जाहिरात करणाऱ्या भारत सरकारला या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना येथे प्राथमिक सुविधा उपलब्ध करणे गरजेचे वाटत नाही का, असा सवाल जयंत वाकोडे यांनी उपस्थित केला.यावेळी या नॅरोगेज रेल्वे लाईनचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करा, येथील रेल्वे स्टेशन तत्काळ कार्यान्वित करा, त्याप्रमाणे आरक्षण खिडकी सुरू करा, सुरक्षा रक्षक, टिसींची नियुक्ती करा अशा विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेना दर्यापूर तालुक्याच्यावतीने विभागीय प्रमुख गुप्ता यांना शनिवारी देण्यात आले. याचा विचार न केल्यास रेल रोको आंदोलन केले जाईल, असा गर्भीत इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.यावेळी अनिल भुसारी (प्रभारी शहराध्यक्ष), प्रवीण पाटील (तालुका प्रसिद्धी प्रमुख), रणजित धर्माळे, शरद विल्हेकर, अमोल चांदुरकर, शक्ती ठाकूर, अनिल राऊत, पप्पू पाटील बायस्कार, गजानन कपिले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.