लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : महाराष्ट्र राज्य चालक-मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी महामार्गावरील वाय पॉईंट येथे सोमवारी रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहतूक खोळंबली. विनापरवानगी आंदोलनाबद्दल पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात आले.कोरोनाकाळात स्कूल बसचालक व मालकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. जगायचे कसे, हा मोठा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. जोपर्यंत आमचा व्यवसाय पूर्ववत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व चालक-मालकांना शासनाने दरमहा १० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, वाहनांचे पासिंग शासकीय अनुदानातून करण्यात यावे, राज्यभरात तसेच बस स्टँडपासून ५० किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्याची परवानगी देण्यात यावी, हप्ते भरण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ व उर्वरित व्याजमाफी देण्यात यावी, स्कूल बस व व्हॅनसाठी असणारी १५ वर्षांची मर्यादा २० वर्षे करावी यांसह इतर मागण्यांसाठी सोमवारी महामार्गावरील वाय पॉइंट येथे महाराष्ट्र राज्य चालक-मालक वाहतूक संघटनेने अतुल खोंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ खोळंबली होती. पोलिसांना पूर्वसूचना न देता हे आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या गेले. त्यामुळे बडनेरा पोलिसांनी एकूण १७ जणांविरुद्ध भादंविचे कलम १४३, १८८, ३४१ सहकलम १३५ अन्वये गुन्हे दाखल केले. यामध्ये प्रवीण पोकळे, सागर सवई, रवींद्र देशमुख, रवींद्र पंचगाम, नयनसिंह ठाकूर, सचिन इंगळे, संतोष यादव, अंकित मिश्रा, दीपक मालधुळे, तुषार भाकरे, विलास तोटे, रंंजित शेटे, दीपक रोंघे, विजय डॅनियल या सर्वांचा आंदोलनात सहभाग होता.शासनाने स्थिती पाहून आमच्या मागण्यांचा तात्काळ विचार करावा, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारादेखील संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
स्कूल बसचालकांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:00 IST
कोरोनाकाळात स्कूल बसचालक व मालकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. जगायचे कसे, हा मोठा प्रश्न समोर उभा ठाकला आहे. जोपर्यंत आमचा व्यवसाय पूर्ववत होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व चालक-मालकांना शासनाने दरमहा १० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, वाहनांचे पासिंग शासकीय अनुदानातून करण्यात यावे, राज्यभरात तसेच बस स्टँडपासून ५० किलोमीटर अंतरापर्यंत वाहतूक करण्याची परवानगी देण्यात यावी
स्कूल बसचालकांचा रास्ता रोको
ठळक मुद्देविविध मागण्या : महामार्गावर वाहतूक खोळंबली, पोलिसांत गुन्हे दाखल