शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:16 IST

शारीरिक, मानसिक व लैंगिक छळाचा आरोप करीत वहिदा नामक महिलेला अटक करा, अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा तृतीयपंथीयांनी घेतला. सोमवारी ४० ते ५० तृतीयपंथीयांनी पोलीस आयुक्तालयात ठिय्या मांडला आणि यानंतर रास्ता रोको केल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

ठळक मुद्देवहिदाला अटक करा : पोलीस आयुक्तालयात ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शारीरिक, मानसिक व लैंगिक छळाचा आरोप करीत वहिदा नामक महिलेला अटक करा, अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा तृतीयपंथीयांनी घेतला. सोमवारी ४० ते ५० तृतीयपंथीयांनी पोलीस आयुक्तालयात ठिय्या मांडला आणि यानंतर रास्ता रोको केल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. वहिदाला ताब्यात घेण्यास दिरंगाई झाल्यामुळे त्यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेऊन व्यथा मांडली. आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर वहिदाला घेऊन बडनेरा पोलिसांनी आयुक्तालय गाठले.आम्रपाली निलू जोगी (३०, रा. निंभोरा वीटभट्टी) याच्या नेतृत्वात ५० तृतीयपंथीयांच्या जमावाने रविवारी दुपारी आयुक्तालय गाठून पोलीस आयुक्तांकडे तक्रार वजा निवेदन सोपविले. तृतीयपंथीय नसतानाही वहिदा नामक महिला तृतीयपंथीयांचा लैंगिक छळ करते. तिच्याकडील काही तरुणांना साडी परिधान करण्यास लावून रेल्वेतील प्रवाशांना पैसे मागण्यासाठी वहिदा पाठविते. ती गुन्हेगारीत सक्रिय असून, त्याच्या बळावर हवे ते करून घेते, असा गंभीर आरोप तृतीयपंथीयांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनातून केला. तृतीयपंथीयांनी ठिय्या देऊन वहिदाला अटक करण्याची मागणी रेटून धरली. सायंकाळपर्यंत पोलीस आयुक्तालय परिसरात त्यांचा ठिय्या होता. यादरम्यान वहिदाला अटक न केल्यामुळे त्यांनी आयुक्तालयापुढील रस्त्यावर आंदोलन छेडले. नारेबारी करीत मागणी बुलंद केली. फ्रेजरपुरा पोलिसांनीही तृतीयपंथीयांंना समजाविण्याचा प्रयत्न केला. अखेर बडनेरा पोलिसांनी वहिदाला ताब्यात घेऊन पोलीस आयुक्तालयात आणले. तिच्यावर प्रतिबंधक कारवाई केली.तृतीयपंथीयांंमध्ये आम्रपाली जोगी, रेखा पाटील जोगी, प्रिया, सिनु, मंगला, रविना, मोगरा, सोनिया, खुशी, पप्पी, राजकुमारी, सोनू, रीतू, शामा, पिंकी, नगीना, कीर्ती, नीलिमा, साधना, पिंकीदादी, सलमा, चांदणी, सारिका, प्रेरणा, अन्वी, प्रीती, आचल आदींचा सहभाग होता.रविवारी तृतीयपंथीयांच्या परस्परविरोधी तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी भादंविचे कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले होते.एक तृतीयपंथीय झाला एचआयव्ही पॉझिटिव्हगैरअर्जदार महिलेने एका तृतीतपंथीयाला एचआयव्हीच्या रुग्णाचे रक्त इंजेक्शनद्वारे दिल्याचा गंभीर आरोप तृतीतपंथीयांनी केला आहे. त्याची वाच्यता तृतीतपंथीयांनी पोलीस आयुक्तांसमोर केली. इंजेक्शन लावलेल्या त्या तृतीतपंथीयाची तपासणी केली असता, तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची बाब पुढे आल्याचे तृतीयपंथीय सांगत आहेत.वहिदा धावली पत्रकाराच्या मागेवहिदाला ताब्यात घेऊन बडनेरा पोलीस आयुक्तालयात आले. यादरम्यान काही पत्रकार वहिदाचे फोटो-व्हिडिओ घेत होते. ही बाब लक्षात येताच वहिदा एका पत्रकाराला शिवीगाळ करीत त्याच्या अंगावर धावून गेली.पोलीस आयुक्तांची तत्काळ दखलतृतीतपंथीयांनी आपल्या छळाची व्यथा पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर मांडली असता, त्यांनी तात्काळ दखल घेत बडनेरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद कुळकर्णी यांना सूचना दिल्या. वहिदा नामक महिला व तिच्यासोबत राहणाऱ्याची चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले. वहिदासोबत काम करणाºया गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पकडण्यास त्यांनी सांगितले.