--------------
खेड येथे बापलेकाला मारहाण
मोर्शी : तालुक्यातील खेड येथे घरापुढे रेती टाकण्याबाबत विचारल्याने दिनेश तायवाडे व शेषराव तायवाडे (६१) या पितापुत्राला काठीने मारहाण करण्यात आली. मोर्शी पोलिसांनी अंकुश गजानन लोणारे (२८) व धनराज गजानन लोणारे (२४) या भावंडाविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.
--------------
मुलीला फूस लावून पळविले
बेनोडा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून १० मे रोजी १७ वर्षीय मुलीला अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार महिलेने दाखल केली. पोलिसांनी मंगळवारी भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला.
---------------
उधारीच्या पैशांवरून मद्यपीचा हल्ला
जरूड : नजीकच्या सुरळी येथील धनराज रमेशपंत गोमकाळे याने विष्णू पांडुरंग शिरभाते (५०) यांना उधार दिलेली रक्कम मागितली. ती मिळाल्यानंतर विष्णू व त्यांच्या पत्नीला मारहाण केली आणि अंगणातील काचेची बॉटल फोडून विष्णू यांच्या डोक्यावर वार केला. तो मद्यपान करून नेहमीच वाद उकरून काढतो, असे तक्रारीत नमूद आहे. वरूड पोलिसांनी विविध कलमान्न्वये गुन्हा नोंदविला.