शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

एसबीआयच्या आणखी दोन खात्यांतून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 23:49 IST

स्टेट बँकेच्या खात्यांमधून परस्पर रक्कम काढून घेतली जात असल्याच्या धक्क्यातून खातेदार सावरले नसतानाच आता पुन्हा दोन खात्यांवर चोरांनी डल्ला मारला.

ठळक मुद्देअमरावतीकरांचे पैसे असुरक्षित : बँकाही अविश्वसनीय, पैसे ठेवायचे कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्टेट बँकेच्या खात्यांमधून परस्पर रक्कम काढून घेतली जात असल्याच्या धक्क्यातून खातेदार सावरले नसतानाच आता पुन्हा दोन खात्यांवर चोरांनी डल्ला मारला. या घटनेमुळे एसबीआयच्या खात्यांत रक्कम किती सुरक्षित, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.नवसारी परिसरातील रहिवासी विष्णू श्यामराव बारब्दे यांच्या एसबीआय खात्यातून ३५ हजारांची रक्कम चोरण्यात आल्याची घटना मंगळवारी समोर आली. यासंदर्भात त्यांनी एसबीआयला तक्रार देऊन गाडगेनगर पोलिसांकडे धाव घेतली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातूनही एका खातेदाराची रक्कम परस्पर काढल्याची विश्वसनीय माहिती आहे. शहरात सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण बँकांच्या विश्वासर्हतेवर परिणाम करीत असून, खातेदारांची संपत्तीही धोक्यात आली आहे.शहरात लाखो नागरिकांची विविध बँकांमध्ये खाती असून, त्यामध्ये कोट्यवधींची संपत्ती जमा आहे. सद्यस्थितीत शहरातील स्टेट बँकेच्याच खात्यातून रक्कम काढण्यात आल्याच्या घटना समोर येत आहेत. त्या अनुषंगाने सायबर सेलने केलेल्या चौकशीदरम्यान शहरातील एसबीआयच्या काही एटीएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती लीक केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. ही रक्कम हरियाणा, गुडगाव व आसाम येथून काढण्यात आल्याची पुष्टी झाली असली तरी पोलिसांचे 'लांब' हात अद्याप गुन्हेगारांपर्यंत पोहोचले नाहीत.यांच्या खात्यातून काढली रक्कमजयवंत इंदूरकर (३२, रा. महेंद्र कॉलनी) यांच्या खात्यातून १ लाख ६० हजार, सरस्वती नगरातील रहिवासी संतोष किरनाके यांच्या खात्यातून ६४ हजार ५०० व एका महिलेच्या खात्यातून १ लाख २० हजार उडविण्यात आले. या तिन्ही घटना १२ ते १३ आॅक्टोबरदरम्यान घडल्या. या तिघांचे बँक खाते राठीनगरातील एसबीआय शाखेत आहेत. बडनेरा येथील अरुण बेलखेडे यांच्या खात्यातून १ लाख ६० हजार रुपये १३ ते १४ आॅक्टोबर दरम्यान काढण्यात आले. विनोद माणिक करंडे (रा.बारीपुरा, बडनेरा) यांच्या एसबीआयच्या चांदूर रेल्वे शाखेच्या खात्यातून १ लाखाची रक्कम काढण्यात आली. १५ ते १६ आॅक्टोबर दरम्यान हा प्रकार घडला. त्याचप्रमाणे शहरातील रहिवासी व मोर्शीत नोकरी करणारे शेख हनिस अब्दुल हमीद यांच्या मोर्शीतील एसबीआय खात्यातील ६० हजारांची रक्कम १६ ते १७ आॅक्टोबर दरम्यान राजस्थानमधील एटीएममधून परस्पर काढण्यात आली आहे. चंदननगरातील रहिवासी गोपाल विनायक इंगळे यांच्या बँक खात्यातून २७ सप्टेंबरपर्यंत १ लाख २७ हजारांची रक्कम लंपास झाली.खातेदारांनो सावधान!एसबीआयच्या खातेदारांची माहिती लीक झाल्याचे सायबर सेलने स्पष्ट केले असून, गुन्हेगारांनी एटीएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती घेतल्याचे निदर्शनास आले आहे. एसबीआय खातेदारांनी आता सावध होण्याची गरज आहे. तपासाच्या अनुषंगाने काही एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज पोलीस गोळा करीत आहेत.