शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या धान्यावर शिक्कामोर्तब?

By admin | Updated: June 15, 2016 00:27 IST

आंध्र प्रदेश व मध्य प्रदेशातून सोळा चाकी ट्रकामध्ये आणलेले धान्य, वर्दळ नसलेल्या ठिकाणी आणून दुसऱ्या ट्रकमध्ये टाकण्यात येते.

नरेंद्र जावरे ल्ल परतवाडाआंध्र प्रदेश व मध्य प्रदेशातून सोळा चाकी ट्रकामध्ये आणलेले धान्य, वर्दळ नसलेल्या ठिकाणी आणून दुसऱ्या ट्रकमध्ये टाकण्यात येते. अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा प्रकार बाजार समितीच्या संचालकांनी रविवार उघडकीस आणला. मात्र क्षणातच त्याचा सेस फाडल्याच्या पावत्या पाठविल्याने या गोडेगबंगालात अनेक दिग्गजांचा सहभाग असल्याची चर्चा असून चौकशीची मागणी एका पत्राद्वारे करण्यात आली आहे. परतवाडा शहरातील वन विभागाच्या कार्यालयाकडून बेलखेडा गांवाकडे रास्ता जातो. तेथे एक गणपति मंदिर असून रविवारी दुपारी ३ वाजता आंध्र प्रदेश पासिंग असलेले ट्रक एपी-२१ टीझेड- ६८९९, सह तीन ट्रक मध्ये एक हजारपेक्षा अधिक गव्हाचे पोते भलेले होते. सदर धान्य एकांतात ट्रक उभे करून महाराट्र पासिंगच्या ट्रकमध्ये भरल्या जात असल्याचा प्रकार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोहर जाधव, दिलीप शेळके व सहकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी चौकशी केली असता हमाल व्यतिरिक्त सर्वांनी तेथून पळ काढला. परिणामी संशयाला आणखी बळ मिळाले. संचालकांनी सादर बाब बाजार समितीचे सचिव मंगेश भेटाळू यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी सदर प्रकाराशी बाजार समितीचा संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र संचालककांच्या मनात संशयाची पास चुकचुकली त्यांनी या धान्य हेराफेरीची माहिती घेतली. तेव्हा त्यांना थेट बाजार समितीचा सेस फाडल्याच पावत्या दाखविण्यात आल्या. मात्र हा माल कुठल्या शेतकऱ्यांचा आहे याची चौकशी त्या व्यापाऱ्यांकडून होणे गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)व्यापाऱ्यांमध्ये धावपळ, खळबळ संचालक मनोहर जाधव व दिलीप शेळके यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली तेव्हा त्यांना सर्व बाबी संशयास्पद आढळून आल्यात. बाजार समितीच्या आवारात नसलेल्या गव्हाच्या तिन्ही ट्रकमधील हजारांवर पोते एकांतात दुसऱ्या ट्रकमध्ये टाकली जात असल्याने बाजार समितीचा लाखो रुपयांचा सेस बुडविण्याचा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू असल्याची चर्चा असून व्यापाऱ्यांना माहीत होताच क्षणात सेस फाडल्याच्या पावत्या पाठविण्यात आल्या, हे विशेष. पोलिसात तक्रार सदर धान्य शासकीय धान्य दुकानातील मोटी आहे किंवा कसे याचा शोध घेणे गरजेचे ठरले. टिंबर डेपो रोडमध्ये अवैधरीत्या चोरीचा माल ट्रकमध्ये पासिंग होत असल्याची तक्रार संचालकांनी बाजार समितीला दिली असून मंगळवारी सायंकाळी परतवाडा पोलिसात देण्याची प्रक्रिया सुरू होती. गव्हासह तूर-तांदळाचासुद्धा सेस बाजार समितीमध्ये पाडण्यात येत आहे. तर दुसरीकडे ट्रेडिंग कंपन्या हा माल आणत असून तो गोपनीय ठिकाणी ट्रकमध्ये का पलटी करण्यात येते हे न उलगडणारे कोडे ठरत आहे.