शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बँक खातेदाराच्या मागे उभे राहून चोरला डाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:58 IST

सायबर गुन्हेगारांनी शहरातील निवडक एटीएमला लक्ष्य केले आहे. एटीएममधून पैसे काढणाºयांमागे उभे राहून डाटा चोरला जात आहे.

ठळक मुद्देसायबर सेल प्राथमिक तपास पूर्ण : आता केवळ आरोपींची शोधमोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सायबर गुन्हेगारांनी शहरातील निवडक एटीएमला लक्ष्य केले आहे. एटीएममधून पैसे काढणाºयांमागे उभे राहून डाटा चोरला जात आहे. हा स्किमिंगचाच प्रकार असून पुण्यातील अटक झालेल्या आरोपींनीदेखील हाच फंडा वापरून एटीएम क्लोन करून खातेदारांचे पैसे काढल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले आहे.शहरातील स्टेट बँकेच्या तीन एटीएममधून सायबर गुन्हेगारांनी हा डाटा मे महिन्यात चोरला होता. त्याआधारे एटीएम क्लोन करून आता पैसे चोरले जात आहे. सायबर सेलने शहरातील एटीएम सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये काही संशयित आढळून आलेत. त्यांनीच स्किमिंग केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांचा प्राथमिक तपास आता पूर्ण झाला असून त्यामध्ये काही आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती आहे.आता त्या आरोपींचा शोध सुरु आहे. अमरावती जिल्ह्यातील स्टेट बँकेच्या अनेक खातेदारांच्या एटीएमची माहिती सायबर गुन्हेगारांनी चोरली असून त्यांच्याही खात्यातून पैसे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसबीआयच्या खातेदारांनी पिन बदलवून घेणे अत्यावश्यक झाले आहे.यासंदर्भात बँकेकडूनही आवाहन करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २० बॅक खातेधारांच्या खात्यातून रक्कम चोरून परस्पर पैसे काढण्यात आले. गुडगाव, आसाम, हरियाणा, नोएडा येथून ही रक्कम विड्रॉल करण्यात आली आहे. अमरावतीच्या एटीएममधून माहिती चोरणारे व गुडगाव, आसाममधून विड्रॉल करणारे हे गुन्हेगार सीसीटीव्हीत कैद असून त्यांची शोधमोहीम आता लवकरच पूर्णत्वाकडे येण्याचे संकेत सायबर सेलने दिले आहे.एसबीआयच्या आणखी एका खातेदाराचे २० हजार उडविलेतेलीपुºयातील रहिवासी विनोद नारायण गद्रे (४०) शनिवारी नवीवस्तीतील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. त्यांनी एटीएम कार्ड मशिनमध्ये टाकताच त्यांना आधार कार्ड क्रमांक लिंक करण्यासंबंधित सूचना मिळाली. त्यामुळे त्यांनी एटीएम कार्ड बाहेर काढले आणि एक्सीस बँकेच्या एटीएममध्ये जाऊन १० हजारांची रक्कम काढली. मात्र, काही वेळानंतर त्यांच्या मोबाइलवर एसबीआयमधून २० हजार रुपये काढल्याचा संदेश प्राप्त झाला. त्यांनी एसबीआय शाखेशी संपर्क केला आणि त्यानंतर बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक मारोडकर यांनी केला.