लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारत व पाकिस्तान यांच्यात संबंध दुरावल्याच्या कारणास्तव अतिरेकी संघटनांकडून देशविघातक कारवाया होण्याची भीती वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने एसटी गाड्यांसाठी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. वाहक, चालकांना ‘जागते रहो’च्या सूचना दिल्या आहेत.राज्य परिवहन महामंडळ किंवा खासगी कंत्राटी बस चालकांकडून प्रवाशांचे सामान, कुरियर पद्धतीने बसच्या टपावरून किंवा अन्य प्रकारे होणाऱ्या मालवाहतुकीद्वारे देश विघातक कृत्य घडण्याची शक्यता लक्षात घेता ही खबरदारी घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी कोकणात एका गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये बॉम्ब आढळून आला. त्यामुळे बसमधून प्रवाशांचे साहित्यास इतर वस्तूंच्या वाहतुकीद्वारे विघातक कृत्य नाकारता येणार नाही, असे परिवहन महामंडळाने म्हटले आहे.गैरकृत्याला आळा घालण्यासाठी अपर परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी थेट वाहन जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. अनधिकृत साहित्य, वस्तू नेत असल्याचे दिसून आल्यास परवाना मार्ग क्षेत्र आदेशाचे उल्लंघन झाल्यास ती वाहने जप्त करण्याचे निर्देश आहेत. त्याहीपुढे जाऊन वाहनाचा परवाना निलंबित किंवा रद्द करावा, अशी ताकीद देण्यात आली आहे. राज्याच्या दक्षता व सुरक्षा पथकाने दिलेल्या आदेशानुसार राज्य परिवहन महामंडळा कडून कार्यान्वित असलेल्या आठ तपासणी पथकांद्वारे आकस्मिक तपासणी विविध मार्गावर केली जात आहे. यासोबतच मध्यवर्ती बस स्थानकासह जिल्ह्यातील इतरही आगारांमध्ये खबरदारी बाळगली जात आहे.परिवहन विभागाच्या निर्देशानुसार प्रवासी वाहनांची मार्ग तपासणी पथकामार्फत तपासणी सुरू आहे. अनधिकृत पार्सली आढळल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल.- श्रीकांत गभणेविभागीय नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ अमरावतीअनधिकृत पार्सलचे काय?खबरदारीची गरज : वाहक करतात वस्तूंची ने-आणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या चालक आणि वाहक यांच्याकडून अनधिकृत पार्र्सल, कुरियरची वाहतूक ही धोकादायक ठरणारी आहे. काश्मिरातील पुलवामा येथे सीआरपीएफच्या वाहनांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर एसटीने सर्तकतेचा इशारा दिला आहे.देशविघातक कारवाया लक्षात घेऊन याच पार्श्वभूमीवर परिवहन महामंडळाने चालक आणि वाहकांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. प्रवाशांची काळजी घेताना बसमध्ये काही बेवारस वस्तू आढळल्यास प्रथमत: पोलिसांना कळवावे, असे निर्देश आहेत. तथापि, एसटीचे चालक-वाहक हे छोट्याशा रकमेसाठी अनधिकृत पार्सल, सामान नेण्याचा प्रकार करतात. एसटी कर्मचाºयांचा मोहदेखील प्रसंगी हजारो प्रवाशांच्या जीविताशी खेळणारा ठरू शकेल, यात दुमत नाही. त्यामुळे देशविघातक कारवाया रोखण्यासाठी उपाययोजनांसोबतच एसटीचे चालक, वाहकांकडून होणारी अनधिकृत पार्सल, साहित्याची ने-आण करणे रोखणे जरूरी आहे. या पार्सल, सामानात कोणी घातपाती कारवाया करण्यासाठी विस्फोटक पदार्थ तर ठेवले नाही, हे कसे समजणार हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे खासगी व्यक्तीमार्फत अनधिकृतपणे कोणत्याही प्रकारचे पार्सल, कुरियर सामान घेऊन वाहतूक करू नये, अशा सूचना परिवहन महामंडळाने दिल्या आहेत.-तर गंभीर स्वरूपाची कारवाईएसटीमध्ये वाहक-चालकांनी अनधिकृतपणे सामान, साहित्य, कुरियर सेवा दिल्यास त्याच्याविरूद्ध गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल, असे पत्र राज्य परिवहन महामंडळाचे सुरक्षा व दक्षता पथकाने २१ फेब्रुवारीला दिले आहेत. विभागीय नियंत्रकांना त्याअनुषंगाने सतर्कता बाळगण्याच्या सूचना आहेत. जिल्ह्यात आठ मार्ग तपासणी पथकाद्वारे विशेष लक्ष ठेवले जात आहे. सामान, पार्सल, कुरियर नेताना आढळल्यास चालक अथवा वाहकांवर निलंबन, बडतर्फीची कारवाईसुद्धा केली जाऊ शकते, असे आदेशात म्हटले आहे.
एसटीला हाय अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:47 IST
भारत व पाकिस्तान यांच्यात संबंध दुरावल्याच्या कारणास्तव अतिरेकी संघटनांकडून देशविघातक कारवाया होण्याची भीती वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने एसटी गाड्यांसाठी ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे. वाहक, चालकांना ‘जागते रहो’च्या सूचना दिल्या आहेत.
एसटीला हाय अलर्ट
ठळक मुद्देसावधान : देशविघातक कारवाया रोखण्यासाठी वाहन तपासणीचे आदेश