शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

तरीही लहानेंना अभय का?

By admin | Updated: December 30, 2014 23:24 IST

तपोवनातील बालगृहात अनाथ, निराधार, निराश्रित मुली सुरक्षित नसल्याच्या मुद्यावर सर्वांचेच एकमत झाल्यानंतरच ११५ मुलींना इतरत्र हलविण्यात आले. अर्थात् तपोवनातील कारभारात अक्षम्य

हा तर दोषच ना ! : अंबापुरीच्या सन्मानावर घाला, नको कुणाचाही मुलाहिजा!गणेश देशमुख - अमरावतीतपोवनातील बालगृहात अनाथ, निराधार, निराश्रित मुली सुरक्षित नसल्याच्या मुद्यावर सर्वांचेच एकमत झाल्यानंतरच ११५ मुलींना इतरत्र हलविण्यात आले. अर्थात् तपोवनातील कारभारात अक्षम्य सदोषता होती, हेच यायोगे सिद्ध झाले. असा सदोष कारभार सातत्याने हाकला जात असताना तपोवनात संचालकपदी कार्यरत असलेले प्रशासकीय अधिकारी अजय लहाने हे कोणते कर्तव्य पार पाडत होते, हा प्रश्न बोचणारा ठरतो. अजय लहाने यांची सुमारे पाच वर्षांपासून विदर्भ महारोगी सेवा संस्थेच्या संचालकपदी नेमणूक आहे. त्या संस्थेतील कारभार निर्दोष, नियमसंगत आणि बालहक्क संरक्षणाच्या दृष्टीने चालावा यासाठी शासनाच्या या अधिकाऱ्याची नेमणूक आहे. विदर्भ महारोगी सेवा संस्थेत लहाने यांच्या रूपाने असलेला हा शासनाचा ‘तिसरा डोळा’ होता. या डोळ्याला ते सर्व दिसणे अपेक्षित होते, जे संस्थेतील नजरांना कदाचित दिसणार नाही, कधिकाळी दिसूनही ते बघणार नाहीत. सतर्कता, दूरदृष्टी, आकलन, अचूक निर्णयक्षमता आणि परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अंगी असावे, अशी शासनाची अपेक्षा आहे. म्हणून तपोवनाच्या संचालकपदी तशा दर्जाच्या अनुभवसंपन्न अधिकाऱ्याचीच नेमणूक करण्यात आली. शासनाचा वर्ग एकचा अधिकारी संस्थेच्या संचालकपदी असल्यामुळे शासन निर्धास्त होते. तपोवनातील कारभार पार पाडताना लहाने यांनी शासनाला अपेक्षित असलेली 'घारीची नजर' बाळगायलाच हवी होती. तो त्यांच्या कर्तव्याचाच भाग होता. ती नजर लहाने यांनी बाळगली असती तर ज्या मुलींची आयुष्ये उद्ध्वस्त झालीत, ती बचावलीही असती. समाजाचे म्हणा की त्या मुलींचे, हे दुर्दैवच की, असा अधिकारी तपोवनाच्या वाट्याला संचालक म्हणून लाभला की, पाणी डोक्यावरून वाहू लागल्यावरही तो सुस्तच होता. त्याची निद्रा त्यावेळी भंगली ज्यावेळी त्याला करण्यालायक काहीच बाकी उरले नव्हते. संस्थेच्या घटनेत नमूद केल्याप्रमाणे, दैनंदिन कामकाजाची जबाबदारी संस्थेचे सचिव आणि संचालक यांच्या शिरावर आहे. अर्थात् सचिव आणि संचालक हे कमालीचे सतर्क असणे घटनेनुसार अपेक्षितही आहे नि बंधनकारकही! ज्यांच्या शिरावर जबाबदारी त्यांच्याच हाती अधिकारांचा राजदंडही असतो.